आरटीई प्रवेशाची लॉटरी फुटली 12 एप्रिलला निकाल मोबाईलवर---
आरटीई च्या 25% प्रवेश प्रक्रियेतून ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही प्रकारे स्थापत्य वागणूक दिली जाणार नाही.
तसेच त्यांच्याबद्दल भेदभाव केला जाणार नाही याची दक्षता शाळा प्रशासन घ्यावी तसेच विद्यार्थ्यांची शाळेतून गळती होणार नाही याची जबाबदारी ही शाळा प्रशासनाची असेल असे प्राथमिक शिक्षण संचालन स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पालकांची तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील शाळांना दिले आहेत .
राज्यातील आठ हजार 828 शाळांमधील एक लाख एक हजार 969 जागांसाठी तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यातील शिक्षण विभागाकडून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी तीन लाख 64 हजार 390 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात आले.
असून या विद्यार्थ्यांची बुधवारी लॉटरी काढण्यात आली ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झाली असली.
तरी एनआयसी कडे लॉटरी द्वारे काढण्यात आलेले क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी दिले जाणार आहेत त्यामुळे या प्रक्रियेनंतरच विद्यार्थ्यांना 12 एप्रिल रोजी प्रवेशाचे संदेश नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यावर प्राप्त होणार आहेत अशी माहिती शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
आरटीई प्रवेश महत्त्वाच्या तारखा ----
🟣12 एप्रिल 2023 प्रवेशाचे एसएमएस मिळणार
🟣 कागदपत्र पडताळणी करण्याची कालावधी 13 ते 25 एप्रिल
🟣 शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश केव्हा घेता येणार 25 ते 30 एप्रिल
आरटीई 25% टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जाणार असून प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड होणार आहे त्यामुळे पालकांनी 25% प्रवेश प्रक्रिये बाबत निवड होणार आहे त्यामुळे पालकांनी या प्रक्रियेबाबत दलाल,संस्था यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये असे आव्हान संचालनांकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment