कॉपी पकडल्याने विद्यार्थिनीने प्रवारा नदीत मारली उडी मासेमारी करणाऱ्या तरुणांनी वाचविले--
उक्कलगाव तालुक्यातील बेलापूर येथील एका विद्यालयात अकरावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीची कॉपी पकडली गेली.
तिने निराशेतून प्रवारा नदी पात्रात उडी घेतली स्थानिक मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला नदीतून सुखरूप बाहेर काढले.
बुधवारी दुपारी ही घटना घडली
प्राध्यापकांनी विद्यार्थिनीची कॉपी पकडल्याने तिने हे कृत्य केल्याचे स्थानिकांनी सांगितले.
राग अनावर झाल्याने तिने उत्तर पत्रिका फाडली आणि वर्गाबाहेर पळत गेली त्याच नैराश्यातून तिने प्रवारा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे प्राध्यापक वर्गाची धांदल उडाली प्रवरा नदीवरील पुलावरून विद्यार्थिनी नदी पात्रात उडी मारली
त्यावेळी मासेमारी करणारे तरुण नदी पात्राजवळ बसलेले होते त्यांनी नदीत झेप घेत मुलीला बाहेर काढले. विद्यार्थिनी ही उक्कलगाव येथील आहे बेलापूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.
विद्यार्थीनिला तातडीने बेलापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथे त्या विद्यार्थिनींना हलवण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कॉपी न करण्याची सामूहिक शपथ विद्यार्थ्यांना दिली होती तशा सूचना सर्वांना देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment