Wednesday, 5 April 2023

NCERT ने पाठ्यपुस्तकातून गांधी हत्या वगळली--

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अत्यंत महत्त्वाचे असे महात्मा गांधी हत्या प्रकरण आणि त्या काळातील दंगलीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेली बंदी आधी प्रकरणे बारावीच्या अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. 

वगळलेली सर्व प्रकारने भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे इतिहासापैकी एक असून ती यापुढे शालेय विद्यार्थ्यांना शिकता येणार नाहीत एनसीईआरटी ने बारावीच्या राज्यशास्त्र या पुस्तकातून केलेले हे बदल आता तो अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.


भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने हत्या केली.


हे प्रकरण आता एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमातून कायमचे हद्दपार होणार आहे.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का घातली होती हा इतिहास देखील पुस्तकातून यापुढे येणार नसल्याने या विरोधात अनेक इतिहास तज्ञ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भातील अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोठा बदल केला नसल्याचा दावा----

एनसीईआरटीने ओव्हरलॅपिंग आणि असंबंद्ध असल्याची कारणे सांगून बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकात गुजरात दंगल,मुगल न्यायालय,आणीबाणी,शीत युद्ध नक्षलवादी चळवळ यावरील धड्यांसह काही भाग अभ्यासक्रमातून वगळले.
 कोणताही मोठा बदल केला नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

No comments:

Post a Comment