महाराष्ट्र राज्यात 800 शाळांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती
राज्यातील बोगस शाळांच्या प्रकरणाची सुरुवात पुण्यातून झाली.
येथील तीन शाळांच्या कागदपत्रांमध्ये गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली.
त्यानंतर शिक्षण विभागाने 1300 शाळांची तपासणी केली आहे.
यात 800 शाळांच्या कागदपत्रांमध्ये काहींना काही दोष असल्याचे आढळून आले आहे.
अशी धक्कादायक माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले.
राज्यातील 800 शाळांच्या कागदपत्रात काही ना काही दोष असल्याचे दिसून आले.
यात कोठेही खोटे कागदपत्र वापरण्याची निदर्शनास असल्यास संबंधित शाळांवर गुन्हा दाखल केला जाईल.
तसेच LOI किंवा बोर्डाची मान्यता नसेल तर
ती शाळा बंद करावी लागणार आहे.
त्यामुळे बोगस शाळा जाहीर करण्याची घाई न करता शिक्षण उपसंचालकांमार्फत शाळांची तपासणी करण्यात येत आहे. राज्यात पुण्यासह,मुंबई,औरंगाबाद येथील आतापर्यंत 100 शाळा बंद केल्या आहेत.
व तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुरज मांढरे यांनी दिली आहे
No comments:
Post a Comment