आपल्या सर्वांना एक हकीकत सांगावी वाटते
मोहोळ पोलिस ठाणेस अडीच महिन्यांपूर्वी एका दहा वर्षाच्या मुलाला पळवून नेल्याचा गुन्हा दिनांक 11 जानेवारी ला मोहोळ जिल्हा-सोलापूर येथे दाखल झाला होता.
चिंचोली काठी येथे राहणाऱ्या मुलाला पळवून नेल्याचा तक्रार त्याचे आजोबा प्रकाश कुंची कोर यांनी दिली.
गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्याचे स्वरूप बघून सर्वस्व पणाला लावून मुलाचा शोध घेण्याचे काम चालू होते.
पण त्याचे धागेदोरे काय सापडत नव्हते.
याचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक खारगे व ढावरे यांना देण्यात आली
तपासा दरम्यान आम्ही विडी घरकुल सोलापूर,लातूर,पंढरपूर,तुळजापूर,अक्कलकोट, बुधडा
या ठिकाणी संशईत लोकांकडे शोध घेतला.
परंतु काही हाती लागले नाही.
परंतु मनामध्ये एकच ध्यास होता मुलगा सापडला पाहिजे.
कारण त्या माऊलीचा चेहरा नजरे समोर वारंवार येत होता.
त्यामुळे त्याचा तपास रोज काहीतरी नव्या मार्गाने करणे चालूच होते. रात्र दिवस नवीन प्रत्येक गोष्टींचा आढावा घेतला जात होता.
मनात जिद्द होती पण मार्ग काय सापडत नव्हता.
अखेर एक दिवस उजाडला आणि सदर मुलाच्या बाबतीत मुलाचा शोध घेण्यासाठी जी माहिती आवश्यक पाहिजे ती माहिती प्राप्त करून घेतली.
माहिती प्राप्त झालेले ठिकाण
हे तेलंगणा राज्यातील असल्याने सदर मिळालेल्या
माहितीचा सखोल अभ्यास करणे उचित होते.
म्हणून टेक्निकल पद्धतीने तपास करून
संशयित इसमाची माहिती प्राप्त करून घेतली.
आणि मिळालेल्या माहितीच्या दिशेने रवाना झालो.
परंतु जिल्हा विकाराबाद राज्य तेलंगाना तेथेही गेल्यानंतर ते मोठे शहर बघून मुलाला शोधने एक आव्हान ठरले. कारण आम्ही तिथे आलो आहे हे त्या संशयीत इसमाला कळणे योग्य नव्हते.
त्यामुळे आम्ही त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती CDR मधून घेतली.
त्यामध्ये त्याच्या संपर्कात फक्त चारच व्यक्ती होते.
त्यापैकी सर्वात जास्त बोललेला एक व्यक्ती त्याला त्याने 73 सेकंद बोलले होते
आणि एकच कॉल केला होता.
इतर तिघांनापण एक एक कॉल आणि पाच सेकंद दहा सेकंद असे बोलणे झालेले होते.
73 सेकंद बोललेला व्यक्ती त्याला नक्की ओळखू शकेल हा अंदाज लावून.
त्याची डिटेल्स घेऊन प्रथम त्याला ताब्यात घेतले.
व त्याला सर्व हकीकत पोलिसी भाषेत सांगितली
तेव्हा त्याने पीडित मुलगा व आरोपी रहात असलेल्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेला.
ते ठिकाण म्हणजे रंगा रेड्डी या ठिकाणी पीडित मुलगा व आरोपी यांना
काही समजण्याअगोदर आम्ही त्यांच्यासमोर गेलो.
व लहान मुलाला आम्ही पोलीस आहोत सोलापूर वरून तुला नेण्यासाठी आलो आहे असे सांगितले.
त्याच क्षणी मुलागा मोठ्याने रडू लागला
व माझी मम्मी कुठे आहे असे म्हणून आजूबाजूला बघू लागला
त्यावेळी आम्ही त्याला सांगितले तुला आम्ही तूझ्या मम्मी कडे घेऊन जाणार आहोत तू घाबरू नको असे म्हंटले त्यावेळी त्याला धीर मिळाला
आणि त्याने रडत रडत सर्व त्या व्यक्तीने केलेला त्रास सांगितला.
त्याने सांगितलेली कहाणी
ऐकून आमचे मन ही सुन्न झाले व त्या व्यक्ती बद्दल भयंकर चीड निर्माण झाली...👊👊👊
सांगायचं तात्पर्य :-
आपल्याही आजूबाजूस एखादा लहान मुलगा त्याची हालचाल
व त्याच्या मनावरती असलेले दडपण ओळखता आल्यास आपणही त्याची विचारपूस करून सुज्ञ नागरिक बनू शकता.
बस्स एवढंच सांगावस वाटलं...
आपण सर्वानी फोन द्वारे मेसेज द्वारे अभिनंदन केले. सर्वांचे मनःपूर्वक आभार...
मोहोळ पोलीस जिल्हा-सोलापूर
विद्यार्थ्यांनी कोणाकडूनही चॉकलेट अथवा खेळण्याची वस्तू घेऊ नये व कोणी सोबत चल म्हटले तरी ते अनोळखी असतील, तर त्यांच्यासोबत जाऊ नये.
तसेच अनोळखी व्यक्तींच्या गाडीला हात करून शाळेत जाऊ नये. फक्त घरातील किंवा आपल्या नातेवाईक शेजारी व ओळखीचे कोणी असेल तर त्यांच्या सोबत जावे.
शाळेत जाताना शाळेच्या आवारात व घराच्या बाहेर खेळताना दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले.तसेच नागरीकांनी तरुणांनी, पालकांनी व शिक्षकांनी याबाबत जागृत राहावे,विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना घाबरून न सोडता दक्षता व काळजी घ्यावी अशा सूचना ही यावेळी पोलीस निरीक्षक यांनी केल्या
No comments:
Post a Comment