अपहरण केलेल्या मुलाला तेलंगणातून ताब्यात घेण्यात मोहोळ पोलिसांना यश
चिंचोली काटी येथे राहणाऱ्या लहान मुला किकराया तेलंगणा येथून सायबर सेलच्या सहकार्याने शोधून काढण्यास मोहोळ पोलिसांना यश मिळाले.
शुक्रवारी दुपारी त्यास मोहोळ पोलीस ठाण्याच्या त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
हा मुलगा 11 एप्रिल रोजी एमआयडीसी चिंचोली काठी येथून हरवला होता.
त्याचे आजोबा प्रकाश कुंची कोर यांनी याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात 11 जानेवारी रोजी पर्यंत दाखल केली होती.
त्याबाबत मोहोळ पोलीस त्यांचा सर्वत्र शोध घेऊन तपास करत होते परंतु त्याचे धागेद्वारे लागत नव्हते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक खारगे व ढावरे यांच्याकडे तपास आल्यानंतर त्यांनी चिंचोली सोलापूर पंढरपूर तुळजापूर लातूर उस्मानाबाद या ठिकाणी जाऊन संशयित लोकांकडे विचारपूस करून आरोपीवर मुलास कसून शोध घेतला.
तसेच संशयित लोकांची मोबाईल कॉल डिटेल्स ही तपासले तरीही याचा तपास लागेना.
त्यांनी या केसचा सखोल अभ्यास करून त्यातील संशयित नंबरची सायबर सेल कडून संपूर्ण माहिती करून घेतली.
त्याचा अभ्यास केला असता त्याची लोकेशन हे तेलंगणा राज्यातील विकाराबाद या ठिकाणी असल्याचे दिसून आले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनावरून या ठिकाणी जाऊन संशयित मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची माहिती घेत मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन सदर मुलगा व आरोपी याबाबत चौकशी केली असता मुलगा व आरोपी हे रंग रेड्डी येथील एका हॉटेलात व स्क्रॅप दुकानात काम करत असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली मुलगा हा एमआयडीसी चिंचोली या ठिकाणी चा राहणारा असून आरोपी हा त्याच्या घराशेजारी राहण्यास होता व तो एमआयडीसी मिळेल ती मजुरी करत होता.
त्याने त्या लहान मुलास मोबाईल घेऊन देतो.
असे सांगून अडीच महिन्यापूर्वी पळवून नेले होते मुलास पळवून नेणारा किसन दुबई या सामलेटी यास पोलिसांनी अटक केली आहे.
अन....त्याने पोलिसांना मारली मिठी
पोलिसांनी पीडित मुलास ताब्यात घेतल्यानंतर आम्ही पोलीस असल्याचे सांगून सोलापूरहून तुला नेण्यासाठी आलो आहोत असे म्हणताच
तो लहान मुलांनी पोलिसांना मिठी मारली व सर्व हकीकत रडून कथन केली.
पीडित मुलाने अनुभवलेला दोन महिन्यातील त्रास ऐकून तेथील उपस्थितीची मने हेलावून गेली.
तुझे नाव बदलायचे आहे
संशयित आरोपी हा पीडित मुलाला धमकी देत आपल्याला मुंबईत जायचे आहे.
तुला नाव बदलायचे आहे असे वारंवार म्हणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यावरून मुलाचे अपहरण करणाऱ्या संशयीताचा
इतिहास व त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment