Thursday, 16 March 2023

शिक्षकांचे पालक वर्गाला केलेली भावनिक विनंती पत्र

शिक्षकांचे पालक वर्गाला केलेली भावनिक विनंती पत्र
प्रति
सन्माननीय पालक वर्ग 
आपल्या सर्वांना आमचा नमस्कार 
आज आपल्या सोबत पत्राद्वारे संवाद साधण्याचे कारण म्हणजे पत्राद्वारे सांगितलेल्या गोष्टी मनाला जरा जास्त भावतात.
आपणास माहीतच असेल की जुनी पेन्शन योजना मिळावी या करिता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपावर असल्याकारणाने आम्ही संपावर आहोत आणि याच करणारे आपली शाळा बंद ठेवावी लागत आहे.
जेवढे तुमच्या मुलाच्या शिक्षणाची तुम्हाला काळजी वाटते तेवढीच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल आस्था आहे.
संविधानाने दिलेली जुन्या पेन्शनच्या हक्कासाठी जो संप पुकारलेला आहे.
 तो फक्त आमच्यासाठीच नाही तर पुढे सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या प्रत्येक मुलासाठी प्रत्येक पिढीसाठी आहे. 
कारण आज जुने पेन्शन योजना जर पूर्वत सुरू झाली नाही तर ती कायमची बंद होईल.
आणि एक प्रकारे आपल्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्या बंद होऊन सर्व खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले जातील आणि खाजगीकरणाची चटके सर्वात जास्त सामान्य जनतेलाच सहन करावे लागतात.
आज जरी सरकारी सेवेत आम्ही आहोत तरी पुढील काळात आपली ही मुले राहणार आहेत 
आपण आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळून मुलांचे भवितव्य चांगले करण्यासाठीच त्यांना प्रोत्साहित करत असतो.
पण नोकरीत जर या सर्व योजनांचा समावेश राहणार नाही तर आपण त्यांना काय प्रोत्साहित करू शेवटी सरकारी नोकरीत सामान्यांचेच मुले असतात.
कोणत्या राजकारणाची किंवा व्यापारांची नसतात 
सरकार खोटे आकडेवारी सादर करून सामान्य जनता आणि सरकारी कर्मचारी यांच्यात एक प्रकारचा आकस आणि भांडणे लावण्याचे काम करत आहे. 
आणि यात नुकसान हे आपल्यासारखे सर्वसामान्य लोकांचेच होणार आहे.
 संपामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आम्ही नक्कीच भरून काढू अशी ग्वाही आम्ही तुम्हाला देतो 
आणि पुन्हा एकदा विनंती करतो 
की आमच्याबद्दल तुमच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ न देता 
आम्हास सहकार्य करावे ही विनंती 
करतो
आपलाच 
शिक्षक वृंद

No comments:

Post a Comment