Thursday, 16 March 2023

आडम मास्तरांकडून एक लाखाचा निधी

💥आडम मास्तरांकडून एक लाखाचा निधी

पुनम गेटवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सहभाग घेत या लढ्यात उडी घेतली आहे.
त्यांनी एक लाख रुपयांचा लढा निधीही या संपकरी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला आहे.
आज जे शासकीय व निमशासकीय कर्मचारी स्वतःच्या हक्कासाठी जो लढा उभारला आहे
 त्याच्यासाठी आडम मास्तर यांनी एक लाख रुपयांची निधी संपकरांसाठी जाहीर केली आहे.
सध्या उन्हाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता संपकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.
यासाठी मॅट व थंड पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या निधीचा उपयोग होईल व जोपर्यंत आपल्या लढायला यश मिळणार नाही सरकारतर्फे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार नाही तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही.
अशी भूमिका माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी मांडली.
 राज्य शासनाच्या तिजोरीवर सद्यस्थितीत कोणतेही आर्थिक भार पडणार नसताना समिती स्थापन करण्याचे नाटक कशासाठी असा सवाल करून त्यासाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करा.
आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्या असे मागणी आडम मास्तर यांनी केली आहे.

तुम्ही आता लावा उद्या कर्मचारी मेस्मा लावतील.

राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच मेस्मा कायदा मंजूर करून घेतला आहे याला सत्ताधारीच काय विरोधी पक्षातील एकही विरोध केला नाही
 साधी चर्चाही न करता मेस्मा कायदा मंजूर केला ही लोकशाहीची थट्टा आहे 
त्यामुळे तुम्ही आता मेस्मा लावा.
येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला मेस्मा लावतील असा इशारा माझी आमदार नरसय्या अडम यांनी दिला...

No comments:

Post a Comment