NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार कडून समिती स्थापन,
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेत घोषणा..
देशभरात NPS ला होत असलेला प्रचंड विरोध आणि जुन्या पेंशन योजनेची मागणी यामुळे केंद्र सरकारने जुन्या आणि नव्या पेन्शन वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रात समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदे मध्ये दिली आहे.
भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी शुक्रवारी एक आर्थिक विधेयक 2023 संसदेत मांडले.
वित्तमंत्री यांनी सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी पेन्शन संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
संसदेत निर्मला सीताराम ने सांगितले की अशी अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत की सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन स्कीम एनपीएस मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
व त्यांनी पेन्शनच्या या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी यांची एक समिती गठित करण्याचा प्रस्ताव संसदेसमोर ठेवला.
महाराष्ट्रात जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन व नवी पेन्शन या संदर्भात समिती गठित करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment