सोलापूर:-दि.14/03/2023
जुनी पेन्शन योजना लागू करा
या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय संघटनेचे हजारो कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. एकच मिशन..जुनी पेन्शन..पेन्शन...अशा घोषणा देत जि. प.परिसर दुमदुमून सोडली. संपात सर्व कर्मचाऱ्यांनी उडी घेतली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांबाबत जोरदार आंदोलन केले.
14 मार्चपासून जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालिका नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र मार्फत राज्य मार्फत कर्मचारी व शिक्षकांनी राज्यव्यापी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे.
या संपात राज्यातील 18 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.
या संपामुळे सर्व शासकीय कार्यालय ओस पडलेले जाणवत होते
या संपास जुनी पेन्शन असलेल्या कर्मचारी यांचा मोठा सहभाग होता.
राज्यातील 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी.
या प्रमुख मागणीसह इतर जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
चहू बाजूकडून शिस्त बद्ध मोर्चा येत होते
या संपास लाडके माझी आमदार नरसिंह आडम मास्तर यांची उपस्थिती होती.
सर्व प्रमुख पक्ष्यांचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होत होते.
ऊन असताना सुद्धा सर्वांचे मार्गदर्शन संपल्याशिवाय एकही कर्मचारी जागेवरून हलले नाहीत.
या बेमुदत संपात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर व शासकीय वैद्यकीय शिक्षक महाविद्यालय,सोलापूरची संघटना सहभागी झाली होती.
तर बार्शी तालुका स्तरावरील मोर्चा मिलिंद तापकिरे सर यांनी सांभाळाला.
जुनी पेन्शन मोर्चेमध्ये सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर यामध्ये महिला शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
उपस्थित सर्व संघटनांचे पदाधिकारी शिक्षक यांनी तहसीलदार,गटशिक्षणाधिकारी यांना आपले निवेदन सादर केले.उपस्थित शिक्षकांना सचिन सरवदे सर यांनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment