मिनी स्कूल बस खाली सापडून विद्यार्थिनीचा मृत्यू
शाळा सुटल्यानंतर मिनी स्कूल बस मध्ये सर्व विद्यार्थ्यांसमवेत बसून नेहमीप्रमाणे आठ वर्षे चिमुकली अपेक्षा नवज्योत भालेराव ही देखील घराजवळ उतरली.
यावेळी ती पायी घराकडे जात असताना मिनी बसच्या पाठीमागून वळाली असता त्याच वेळी चालकाने वाहन मागे घेतल्याने अपेक्षा टायर खाली सापडून जागीच मृत्युमुखी पडली.
या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे
जेलरोड भागातील पवारवाडी येथील हरी गोकुळधाम सोसायटीत राहणारी अपेक्षा सकाळी साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे स्कूल बस मधून साने गुरुजी नगर येथील नवीन मराठी शाळेला गेली होती.
शाळा सुटल्यानंतर स्कूल बस मधून सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास बस चालकाने तिला घराजवळ उतरवले यावेळी ती बस मधून उतरून पायी घराकडे जात होती यावेळी तिने बसच्या पाठीमागून वळण घेतल्या असता त्याच वेळी स्कूल बस प्रवीण दगा शेजवळ यांनी रिवर्स गिअर टाकल्याने बस वेगाने पाठीमागे आली.
आणि दुर्दैवाने अपेक्षाला जोरदार धक्का बसल्याने ती गत प्राण झाली.
चालक प्रवीण शेजवळ याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी समावली आहे...
No comments:
Post a Comment