Wednesday, 15 March 2023

दुसऱ्या दिवशीही शासकीय कर्मचारी आक्रमक;तहसील पंचायत समित्यांसह इतर विभागातील कामकाज ठप्प बार्शीत निषेध मोर्चा

दुसऱ्या दिवशीही शासकीय कर्मचारी आक्रमक तहसील पंचायत समित्यांसह इतर विभागातील कामकाज ठप्प बार्शीत निषेध मोर्चा

जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले होते.
बार्शी येथे घोषणाबाजी करीत नगरपरिषदेच्या आवारात शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाचे निषेध व्यक्त केला.
कामगार एकजुटीचा विजय असो एकच मिशन जुनी पेन्शन आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे.
अशा घोषणाबाजी करीत नगर परिषदेच्या आवारात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाचा निषेध व्यक्त केला.
कर्मचारी संपामुळे कामकाज ठप्प झाले असून सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत बार्शी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व अग्निशमन झाला व्यतिरिक्त आरोग्य आस्थापना कर वसुली यासह अन्य विभागातील 218 कर्मचाऱ्यांपैकी 194 कर्मचारी संपावर गेले आहेत घनकचरा काम कंत्राटी कामगारांकडून केले जात आहे.
अशी माहिती मुख्याधिकारी तथा बाळासाहेब चव्हाण यांनी दिली तहसील कार्यालयातील 52 तलाठी दहा मंडलाधिकारी 25 अव्वल कारकून व लिपिक आठ शिपाई संपावर गेली असून केवळ तहसीलदार व नायब तहसीलदार कार्यरत आहेत अशी माहिती सुनील शेरखाने यांनी दिली पंचायत समिती मधील 87 ग्रामसेवक कार्यालयातील 53 कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी 37 जण संपामध्ये सहभागी झाले आहेत यामध्ये विस्तार अधिकारी वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक शिपाई यांचा समावेश आहे 
अशी माहिती गटविकास अधिकारी अंधारे यांनी दिली एकात्मिक बाल विकास कार्यालयातील सहा लिपिक पर्यवेक्षक विस्तार अधिकारी असे सहा कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण यांनी दिले 
बार्शी तालुक्यात जिल्ह्यात परिषदेच्या 177 प्राथमिक शाळा असून त्यामध्ये 641 शिक्षक कार्यरत असून त्यापैकी 267 जण संपात सहभागी झाले आहेत 
353 जण सहभागी नाहीत तर कार्यालयात सात जणांपैकी सहा संपावर आहेत अशी माहिती तांबे यांनी दिली
बार्शी

No comments:

Post a Comment