Wednesday, 15 March 2023

बापरे पेन्शन योजनेचे 25 कोटी गेले कुठे?

बापरे पेन्शन योजनेचे 25 कोटी गेले कुठे?
शासनाच्या सूचनेप्रमाणे जी.प. लेखा वित्त विभागाने शिक्षकांच्या नवीन पेन्शन योजनेत मार्च 2021 पर्यंत जमा रकमेवरील व्याज जानेवारी 2023 मध्ये राष्ट्रीय निवृत्त योजनेत वर्ग केले.
मग एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2022 या 20 महिन्यांच्या कालावधीतील सुमारे 20 ते 25 कोटी रुपये व्याज गेले कुठे?असा प्रश्न जुनी पेन्शन हक्क लढा सेनेने उपस्थित केल्याने शिक्षक चक्रावले 
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावून
 शिक्षकांचा गैरसमज दूर केला शिक्षक सेना प्रणित जुनी पेन्शन हक्क लढा सेनेने निवेदनाद्वारे शासनालाच प्रश्न विचारला होता.
डीसीपीएस या नवीन पेन्शन योजनेत सन 2012-13 ते सन 2021-22 पर्यंत शिक्षकांचे पैसे कपात करण्यात आले.
डीसीपीएस ऐवजी आता एनपीएस योजना लागू करण्यात आली.
या योजनेत डीसीपीएस साठी जमा रक्कम व त्यावरील व्याजाचे ताळेबंद करून ती संपूर्ण रक्कम मार्च 2021 पर्यंत एनपीएस खात्यावर जमा करण्याच्या सूचना शिक्षण संचालनाच्या होत्या
 त्यानुसार जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने मार्च 2021 पर्यंतच्या रकमा जानेवारी 2023 मध्ये भरल्या.

अनेक शिक्षकांनी खातेच सुरू केले नाही
..3195 शिक्षक नवीन पेन्शन योजनेचे लाभधारक जिल्ह्यात आहेत 
त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते कारणे बंधनकारक आहे 
1040 शिक्षकाने अद्याप हा क्रमांक काढलेला नाही
संभाजीनगर

No comments:

Post a Comment