बोईसर मधील बेपत्ता मुले स्वग्रही
84 पैकी 79 मुलांचा शोध
पोलिसांच्या कामगिरीची पालकांकडून कौतुक
बोईसर मधून गेल्या वर्षभरात 84 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती.
त्यामधील 79 मुलांचा बोईसर पोलिसांनी शोध लावला असून
त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्याची कामगिरी
पोलिसांनी केली आहे.
मुले परत आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही आत्यानंद झाला
असून त्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
बोईसर तारापूर हे प्रमुख औद्योगिक शहर असल्याने लाखो परप्रांतीय कामगार या ठिकाणी राहत आहेत.
वाढत्या लोकसंख्येमुळे चोरी,घरफोडी,अपहरण,हत्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.
अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना गैर-धंध्यांना लावण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपअधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली
व त्यांच्या टीमने कौशल्यपूर्ण तपास करीत
2022-23 वर्षात अपहरण झालेल्या
84 पैकी 79 मुला-मुलींचा शोध लावून
त्यांना पुन्हा आपल्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्त केले.
यामध्ये दुर्दैवाने एका मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती
तर एका मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते.
बोईसर तारापूर मधून आपण केलेल्या मुलांपैकी
स्थानिक परिसरातून 3 मुले आणि 11 मुले
पर जिल्ह्यातून 17 मुले व 45 मुली तर
गुजरात,बिहार उत्तर प्रदेश व नगर हवेली येथून मुलांचा शोध घेतला आहे.
या सर्व गोष्टीतून पोलिसांना यश प्राप्त झाले आहे
प्रदीप कसबे वरिष्ठ पोलीस
बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ज्या मुलांचे अपहरण करण्यात आले होते
व काही मुले घरातून काही कारणांमुळे निघून गेली होती.
त्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध पदके तयार करण्यात आली आहेत.
राज्यातील इतर भागातून व परराज्यातून मुलांचे
सुखरूप शोध घेऊन मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येत आहे
यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर
कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
No comments:
Post a Comment