Wednesday, 15 March 2023

दुसऱ्या दिवशीही प्रशासकीय कारभार ठप्पच;आज पासून आंदोलन तीव्र करणार-सोलापूर

दुसऱ्या दिवशीही प्रशासकीय कारभार ठप्पच;आज पासून आंदोलन तीव्र करणार-सोलापूर
एकच मिशन जुनी पेन्शनचा पुकार करीत सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सुरू केलेला बेमुदत संप बुधवारी दुसऱ्या दिवशीही कायम होता.
संपामुळे कर्मचारीच कार्यालयात उपस्थित नसल्याचं संपूर्ण जिल्ह्यात कारभार ठप्प झाला आहे दरम्यान सरकारकडून दखल न घेता उलट मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा दिल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे .
या संदर्भात राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अमृत कोकाटे व शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी संयुक्त पत्रक काढून माहिती दिली आहे जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच राहणार आहे.
काही मंडळीकडून संप मिटल्याचा अफवा पसरवल्या जात आहेत.
परंतु या अफवांचा कुठेही बळी पडू नये राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांनी असे आवाहन कोकाटे व गायकवाड यांनी केले आहे.
गुरुवार पासूनच्या आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात आली आहे 
गुरुवारी 16 मार्च रोजी जिल्हा परिषदेमधील पुनम गेट येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम 
शुक्रवार 17 मार्च रोजी मुंडण आंदोलन व घोषणाबाजी शनिवारी 18 मार्च रोजी भिक मागू आंदोलन 
रविवारी 19 मार्च रोजी गांधीगिरी पद्धतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे 
या सर्व आंदोलनात कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक इंदापुरे यांनी केले आहे 
बुधवारी दुसऱ्या दिवशीही सर्वच कार्यालय कर्मचाऱ्यांना ओस पडली होती 
यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबले आहेत.
विद्यार्थी शेतकरी व सर्वसाधारण नागरिकांचा या संपाचा चांगलाच फटका बसत आहे.
याविषयी नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे

💥आडम मास्तरांकडून एक लाखाचा निधी
पुनम गेटवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सहभाग घेत या लढ्यात उडी घेतली आहे
 त्यांनी एक लाख रुपयांचा लढा निधीही या संपकरी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला आहे.
 राज्य शासनाच्या तिजोरीवर सद्यस्थितीत कोणतेही आर्थिक भार पडणार नसताना समिती स्थापन करण्याचे नाटक कशासाठी असा सवाल करून त्यासाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करा आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्या असे मागणी आडम मास्तर यांनी केली आहे


तुम्ही आता लावा उद्या कर्मचारी मेस्मा लावतील.

राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच मेस्मा कायदा मंजूर करून घेतला आहे
 याला सत्ताधारीच काय विरोधी पक्षातील एकही विरोध केला नाही 
साधी चर्चाही न करता मेस्मा कायदा मंजूर केला ही लोकशाहीची थट्टा आहे 
त्यामुळे तुम्ही आता मेस्मा लावा.
येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला मेस्मा लावतील 
असा इशारा माझी आमदार नरसय्या अडम यांनी दिला...

No comments:

Post a Comment