Wednesday, 15 March 2023

आमदार,खासदारांना पेन्शन;आम्हाला का बर देत नाही?भर रस्त्यावर उन्हात बसल्या महिला

,खासदारांना पेन्शन;आम्हाला का बरं देत नाही?भर रस्त्यावर उन्हात बसल्या महिला
पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या आमदार खासदारांना 50 हजारांपेक्षा जास्त पेन्शन आयुष्यभर दिली जाते आम्ही आयुष्यभर सेवा करतो.
 निवृत्तीनंतर आम्हाला पुरेशी पेन्शन नको का असा सवाल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आला. 
दिवसभर महिला कर्मचारी भर उन्हात रस्त्यावर बसून होत्या एक मिशन जुनी पेन्शन यास अन्य विविध मागण्यासाठी पदोन्नती मिळालेल्या वर्ग दोन तीन चार संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे
 सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसमोरील पुनम गेट समोर सहकारी साडेदहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली.
महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी एक मिशन जुनी पेन्शन हे घोषवाक्य लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. 
नेत्यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शन मिळाले नाही तर आगामी काळात सत्ताधाऱ्यांना मतदान करायचं नाही असा सल्ला दिला 
कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
सोलापूर जिल्हा शासकीय,निम शासकीय समितीचे अध्यक्ष शंतनू गायकवाड व आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर

No comments:

Post a Comment