संपाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य कर्मचारी आपल्या संपावर ठाम
असून विविध संघटनांची राज्यभरात आंदोलने सुरू आहेत.
सोलापुरात आरोग्य कर्मचाऱ्यांचा आजचा दुसऱ्या दिवशीही संप सुरू आहे.
या संपामध्ये सर्व कर्मचारी,परिचारिका सहभागी असून सोलापूर,नागपूर,पुणे येथील आरोग्य विभागाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आले आहेत. संपात 350 हुन अधिक परिचारिका सहभागी आहेत तर 110 चतुर्थ कर्मचारी ही संपात सहभागी झालेले आहेत
यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापुरात चाळीस हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आले आहेत.
कालपासून जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व कर्मचारी संपावर असताना त्याचा परिणाम आजही दिसत आहे.
आज एकही परिचारिका कामावर हजर नाहीत
जुन्या पेन्शन योजनांचा निर्धार करून आजही सर्व कर्मचारी संपावर ठाम आहेत.
सर्व परिचारिका आपल्या हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपावर ठाम आहेत
सरकारतर्फे वारंवार चर्चेतून मार्ग काढू असे सांगण्यात येत आहे.
संप मागे घ्या असेही सांगण्यात येत आहे तरीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम आहेत
एकच मिशन जुनी पेन्शन
No comments:
Post a Comment