Wednesday, 15 March 2023

राज्य सरकारी,निमसरकारी कार्यालयात बंदला 100% टक्के प्रतिसाद

राज्य सरकारी निमसरकारी कार्यालयात बंदला 100% प्रतिसाद सर्व कामकाज ठप्प
जुनी पेन्शन योजना लागू करावी
या प्रमुख मागणीसाठी
  राज्य सरकारी निम सरकारी,जिल्हा परिषद,महसूल,शिक्षण,सार्वजनिक बांधकाम,विभाग कृषी सहकार,जलसंपदा आदींसह शुभारे शासनातील 32 विभागांचे अधिकारी कर्मचारी 
यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे 
या संपाला दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळालेले कामकाज ठप्प झाले 
या संपात पुणे जिल्ह्यातील सर्व विभागातील मिळून सुमारे 65000 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले 
असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
 त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कामकाजावर याचा परिणाम झाला असून सर्व कामकाज ठप्प आहेत.
सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी या संपात सहभागी झाले त्यामुळे राज्य सरकारच्या बहुतेक कार्यालयांमध्ये सकाळपासूनच शुक शुकाट होता 
अधिकारी वगळता अन्य कर्मचारी कामावर नव्हते त्यामुळे या कार्यालयामधील कामकाज विस्कळीत झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार सुमारे वर्ग 3 आणि 4 कर्मचारी आहेत त्यापैकी कोणीही दुसऱ्या दिवशी कार्यालय मध्ये आले नव्हते
 त्यामुळे येथे संपला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे म्हंटले आहे 
तसेच येथे कार्यालयाची शिपाई नव्हते त्यामुळे दहा होमगार्ड्स यांना बोलवण्यात आले 
कर्मचारी कामावर नसल्यामुळे सर्वच कार्यांमध्ये फक्त अधिकारी उपस्थित होते 
अधिकारी वर्गाने या मोकळ्या वेळात प्रशासकीय कामकाज मार्गी लावले

No comments:

Post a Comment