Saturday, 18 March 2023

सोलापुरात जुनी पेन्शन योजनेसाठी विराट महामोर्चा मोर्चेत हजारो कर्मचाऱ्यांची उपस्थिती


Old Pension Scheme : राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) 
रद्द करुन जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी,
अशी शासकीय कर्मचारी, शिक्षकांची मागणी आहे.
या मागणीसाठी कर्मचारी मंगळवारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. 
राज्य सरकारी,निमसरकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांतील कर्मचारीही संपावर आहेत. 
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हा संप होत असून
 आज सकाळ पासून सोलापूर येथील पार्क चौकात सकाळ पासून गर्दी पहावयास मिळत होती.
तालुकास्तरा वरून सर्व कर्मचारी मिळेल त्या वाहनाने सोलापूर मध्ये जमले होते.सर्व जण एकच मिशन जुनी पेन्शन ची घोषणा देत होते.महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती संपात असणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती शिस्तबद्ध रॅली ने सर्वांचे लक्ष वेधले 
यामध्ये PPT किट घातलेले कर्मचारी
 विशेषतः अपंग कर्मचारी मोर्चेत सहभागी झाले.होते
 काही सरकारी कर्मचारी कांताराच्या वेशभूषा मध्ये उपस्थित होते. 
फक्त शासकीय कर्मचारीच नव्हे तर 
राजकीय पदाधिकारी सुद्धा पेन्शनच्या हक्कासाठी या मोर्चेमध्ये सहभागी झाले होते 
ही रॅली चार पुतळा पार्क चौक येथून डफरीन-हरीभाई देवकरण या मार्गे
 जिल्हा परिषद येथे दाखल झाली. 
या संपात महाविकास आघाडी व आप याचे पाठिंबा होते
 या सभेस माजी मंत्री नरसय्या आडम यांनी  दादा च्या 
(जुनी पेन्शन विसरा) 
वाक्याची मला सारखी आठवण होते असे सांगितले 
यामध्ये शिक्षक आमदार ही सामील झाले होते.
यावेळी सर्वजण हातवर करून शपथ घेतली 
की जो कोणी पेन्शन लागू करेल  त्याला सर्वजण मतदान करू अशी शपथ घेतली. 
सर्व कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी व त्यावर एकच मिशन जुनी पेन्शन असे  वाक्य लिहिलेले होते या संपात बार्शीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी शहरातील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले
यावेळी या मोर्चासाठी पोलिसांचे अचूक नियोजन होते. 
रहदारीस मोर्चेचा कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेत असल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment