बारावी बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोन वेळा
आता बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
या संदर्भात निर्णय झाल्यास सेमिस्टर पद्धतीने वर्षातून बारावी बोर्ड परीक्षा दोन वेळा घेतली जाईल.
अशी माहिती मिळत आहे.
याशिवाय बारावी बोर्डाची परीक्षा देताना
विद्यार्थ्यांना आर्टस्,कॉमर्स सायन्स अभ्यासक्रमाच्या मर्यादा न ठेवता
विविध विषय निवडून बारावी बोर्ड परीक्षा देता येईल.
नवे नॅशनल करिक्यूलम फ्रेमवर्क तयार करणारे तज्ञ समितीने
बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात शिफारशी मांडले आहेत.
जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार नवीन निर्णय झाल्यास
या बारावी बोर्ड परीक्षा नेमके कशा होतील.
असा प्रश्न विद्यार्थी पालकांसोबतच शिक्षकांच्या मनातही निर्माण झाला आहे.
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणारी बारावी बोर्ड परीक्षा आता एक शैक्षणिक वर्षात दोन वेळा घेण्याचा विचार
नॅशनल करिक्युलम नव्याने तयार करणाऱ्या देशातील तज्ञ मंडळींनी मांडाला आहे.
या नव्या फ्रेमवर्क नुसार सेमिस्टर पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून एकदाच नाही
तर दोन वेळेस घेण्यात येतील शिवाय या नव्या फ्रेमवर्क नुसार आर्टस कॉमर्स सायन्स या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना देण्याची मर्यादा नसेल.
अशी शिफारसही केली आहे.
या आधी कोरोना काळात मागील शैक्षणिक वर्षात अशा प्रकारे बोर्डाच्या वर्षातून दोन वेळेस
सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रयोग
सीबीएससी आणि आयसीएससी बोर्ड कडून करण्यात आला.
तज्ञांची शिफारस------
* बारावी बोर्ड परीक्षा एकाच वर्षी दोनदा सेमिस्टर पद्धतीने घेतली जावी.
* बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्याला आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अभ्यासक्रमातील विषयांची मर्यादा नसावी.
* बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे कोर्स उपलब्ध ठेवावेत त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीच्या अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील.
* यासाठी अकरावी बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला जाईल.
No comments:
Post a Comment