उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी--------
उष्णता कमी करणाऱ्या पदार्थाचा वापर करावा.
उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थ कमी खावेत.
आठवड्यातून एकदा एक ग्लास दुधीचा रस घ्यावा.
दुधीभोपळा/कोहळा साल काढून मिक्सरमध्ये घालावा,
थोडेसे पाणी आणि चवीसाठी थोडे संधव मीठ, लिबू घालावे.
वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे?
सध्या वाढत्या उन्हामुळे हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे.
उन्हाच्या वेळेस बाहेर पडायचे असेल काही कामासाठी, तर उपाशीपोटी बाहेर पडू नये.
कान-डोके झाकले जाईल अशी टोपी घालावी.
सोबत एखादा लहान-मध्यम आकाराचा कांदा घेऊन जावे. मधेमधे हुंगता येईल.
त्याने ऊन लागण्याची शक्यता कमी होते.
एकदम कूलर च्या किंवा ए. सी. च्या खोलीतून उन्हात पदार्पण करू नये.
किंवा उन्हातून एकदम ए. सी., कूलर मध्ये जाऊ नये.
दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की,
उन्हाळा सहन करण्याच्या दोन पद्धती आहेत.
एक म्हणजे, वर सांगितल्या प्रमाणे कान-डोके झाकणे. पण एकदा जर तुम्ही ती पद्धत स्वीकारली तर, कायम उन्हाळा संपेपर्यंत ती तशीच सांभाळावी लागेल.
म्हणजे कान-डोके न झाकतां तुम्ही एकदाही तसेच बाहेर पडता कामा नये.
हे अतिशय महत्त्वाचे.
दुसरी पद्धत
अशी आहे की, ऊन वाढणे सुरू झाल्यापासून ते उन्हाळा संपेपर्यंत एकदाही डोके-कान न झाकणे.
मग तापमान ४२-४५-४६-४७ कितीही वाढो.
मी स्वत: मूळचा नागपूरचा असल्यामुळे लहानपणापासून हीच पद्धत कायमसाठी स्वीकारलेली आहे.
मग तुम्ही एकदाही कुठलीही टोपी घालायची नाही. हे अतिशय महत्त्वाचे.
त्याऊपर जर ऊन लागले तर कांद्याचा रस काढून तळहात, तळपाय, डोके यांस लावावा.
तसेच कानातही टाकावा. त्याने ताप लवकर आटोक्यात येतो.
सकाळ-संध्याकाळीही जेवणात कच्चा कांदा खावा.
उन्हाच्या वेळी बाहेर, घरी चहा-काॅफी घेणे, संध्याकाळी थंड पेय घेणे.
उन्हातून हाॅटेल मध्ये गेल्यावर थंड पेय पिऊ नये.
No comments:
Post a Comment