Sunday, 30 April 2023

आजच्या महत्त्वाच्या बातम्या सोमवार दिनांक ०१ मे २०२३

सूर्याजी पिसाळ कोण होते? त्यांना फितूर का म्हटले जाते?

सूर्याजी पिसाळ कोण होते? त्यांना फितूर का म्हटले जाते?

वाईच्या वतन साठी / देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. 
आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.
संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर झुल्फिकारखान ने रायगड ला वेढा घातला.
मराठ्यांची राजधानी ल वेढा अन राजा च नुकतीच हत्या झाला होता.तरी पण मराठयानी आठमहिने किल्ला निकराने लढवला.किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. 

बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता किल्लेदार म्हणून.
 त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्या आधीच आधीच राजाराम महाराज काही निवडक लोकसंहित रायगडावरून निसटले होते.
जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत येसु बाईंनी मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली.
ही कथा जनमानसात प्रसिद्ध आहे.
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार या मध्ये सांगितलेला हा खरा मागोवा.

सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली.

रायगड मोगलांच्या हाती लागल्यानंतर बादशहाने जुल्फिकारखानास जिंजी किल्ल्याच्या मोहिमेवर पाठविले. (30 नोव्हेंबर 1689) त्यावेळी सूर्याजी पिसाळही त्याच्याबरोबर गेला. जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याने वाईच्या पूर्ण देशमुखीचे वतन मिळविले. पण ते जिंजीला पोहचेपर्यंत परिस्थिती बदलली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांच्या फौजांनी मोगलांनी जिंकलेले गडकोट व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्यात वाई परगणाही पुन्हा एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला. आणि पुन्हा एकदा दत्ताजी पिसाळ याला वाईची देशमुखी देण्यात आली. जिंजीचा वेढा सुरू असताना ही बातमी सूर्याजीला समजली असावी. येथपावेतो त्याच्या लक्षात वारा फिरल्याचे आले असावे. त्यामुळे मग त्याने राजाराम महाराजांशी संधान बांधले आणि जुल्फिकारखानास आणि मोगली लष्करास गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनास गेला. तेथे त्याने राजाराम महाराजांना त्याच्याकडील जुनी आदिलशाही फर्माने दाखविली. ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या. त्या घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण रामचंद्रपंत आदी प्रधान व अधिका-यांना वाईच्या देशमुखीचा सर्व इतिहास माहित असल्याने तेथे सूर्याजीची डाळ शिजली नाही. तेव्हा तो पुन्हा कर्नाटकातून जिंजीला गेला.

तेथे त्याने आता निराळेच डाव लढविण्यास सुरूवात केली. राजाराम महाराजांची सगुणाबाई नावाची अत्यंत सुंदर नाटकशाळा होती. राजा कर्ण हा तिचा मुलगा. तिला आणखी एक मुलगीही होती. या कन्येबरोबर आपल्या मुलाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव सूर्याजीने महाराजांजवळ मांडला. सूर्याजीसारखा घरंदाज मराठा आपल्या पुत्राचे लग्न दासीकन्येशी लावण्यास तयार झाल्याचे पाहून राजाराम महाराजांनी त्याला आता वाईची सगळीच देशमुखी दिली.

राजाराम महाराजांनी दत्ताजीकडील देशमुखी काढून घेतल्याचा जो रोखा उपलब्ध आहे, त्यात ते म्हणतात - "सूर्याराऊ पिसाळ... हे मोगलाईतून स्वामीसंनिध येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदीत केले.... सूर्याराऊ पिसाळ याणी ... मोगलाईमध्ये मबलग पैके खर्च करून दिवाणात सीरणी देऊन फर्मान करून घेतले, अलीकडे स्वामीच्या पायापासीही येकनिष्ठा धरून संनिध येऊन सेवा करीत आहेत...."

पण यानंतरही देशमुखीची वाद काही मिटला नाही. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी दत्ताजीस त्याचे वतन परत केले. तेव्हा मग सूर्याजी पुन्हा मोगलांना जाऊन मिळाला. मोगलांनी वाईचे ठाणे पुन्हा जिंकले असावे. त्यावर इस्माईलखान मखा याची ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सूर्याजीने त्याला हाताशी धरले. परगण्याचे देशपांड्यांसारखे वतनदार व दत्ताजी यांना बोलावून त्यांना कैद केले आणि त्यांच्याकडून सूर्याजीच्या निम्म्या वतनाचा महजर तयार केला. याच महजरात सूर्याजीने वतन सोडविण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रूपये खर्च केल्याचा उल्लेख आहे.

या काळात औरंगजेब बादशहाची छावणी विशाळगडाच्या पायथ्याशी होती. दत्ताजीने तेथे जाऊन फिर्याद नोंदविली. औरंगजेबाला त्याची बाजू न्याय्य वाटल्याने त्याने सूर्याजीने केलेल्या सेवेकडे न पाहता दत्ताजीला त्याच्या वतनाचे फर्मान दिले, एवढेच नव्हे, तर इस्माईलखान मखा याची वाईच्या ठाणेदारपदावरून बदली करून तेथे यासीनखान याला पाठविले. दत्ताजी वाईस येऊन वतनदारी अनुभवू लागला.
इकडे सूर्याजीही इरेस पेटला. छावणीत जाऊन त्याने खूप लटपटी-खटपटी केल्या. मुसलमान धर्म स्वीकारल्यास बादशहाची मर्जी प्रसन्न होते हे त्याला माहित होते. तेव्हा बादशहाची मेहेरबानी मिळविण्यासाठी तोही मुसलमान झाला. पण दत्ताजीची बाजू इतकी न्याय्य होती, की औरंगेब बादशहाने सूर्याजीने धर्मांतर केले तरी त्याला वतन काही दिले नाही.

हे प्रकरण नमूद करून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना (राजाराम महाराजांना) जमली नाही तो औरंगजेबाने करावी, आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर करावी, याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे.

सूर्याजीचा हा वतनलोभ, त्यासाठी त्याने केलेली कारस्थाने हे सर्व तेव्हाच्या मराठा वतनदारांच्या प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे.

आणि अखेरीस येथे एक बाब नमूद करायलाच हवी, की भलेही सूर्याजी पिसाळ रायगडचा फितूर नसेल, पण तो त्याच्यासारख्या अनेक वतनदारांप्रमाणे स्वराज्यद्रोही मात्र निश्चित होता.

संदर्भ/ तळटीपा
1]मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993, पृ. 109 ते 120.

वारणेचा प्रसिद्ध तह नक्की काय होता?


वारणेचा प्रसिद्ध तह नक्की काय होता?

सन १७०० साली शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर पुढे सात वर्षे महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शंभूपुत्र शाहू मुघलांच्या कैदेतून सुटून आले व त्यांनी गादीवर आपला हक्क सांगितला. यातून वाद निर्माण होऊन १७०७ ते १७१० या काळात स्वराज्याच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या. या दोन्ही गाद्यांमध्ये श्रेष्ठत्वासाठी नेहमी लढाया व्हायच्या. मात्र सन १७३१ साली सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेऊन आपले बंधू कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांच्याशी तह केला. हाच तो इतिहास प्रसिद्ध 'वारणेचा तह' होय.
त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. वारणा नदी दोन्ही राज्याची सीमा बनली. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे.

तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत.
या तहान्वये दोन्ही छत्रपतींनी दोघांचाही दर्जा समान असल्याचे मान्य केले व आपल्या राज्यांच्या सीमा ठरविल्या. यामुळे छत्रपती घराण्यातील भाऊबंदकी कायमस्वरुपी संपुष्टात आली. १७३१ नंतर कोल्हापूर व सातारा छत्रपतींदरम्यान एकही लढाई झाल्याचा किंवा वैमनस्य उद्भवल्याचे उदाहरण इतिहासात नाही. उलट दोन्ही छत्रपती नेहमी एकमेकांकडे रहायला जात असल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. दोन्ही छत्रपतींच्या बंधुत्वाचे व सलोख्याचेही अनेक पुरावे इतिहासात मिळतात.
पुढे पेशव्यांनी दोन्ही गाद्या एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही.

वारणेच्या तहानंतर सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची वारंवार काळजी घेतली होती. कोल्हापूर राज्याविरुद्ध कुणी सरदार काही हालचाली करत असेल तर त्यास शाहू महाराजांनी खडसावलेली पत्रे आजही आपल्याला पहायला मिळतात. शाहू महाराजांच्या अत्यंत लाडक्या बाजीराव पेशव्याने जेव्हा कोल्हापूर राज्याची काही गावे लुटली तेव्हा त्यांची कानउघाडणी करण्यासही शाहू महाराजांनी कमी केले नाही. उलट ते म्हणायचे की "आमच्या बंधूंशी (कोल्हापूरच्या छत्रपतींशी) युद्ध म्हणजे खुद्द आमच्याशी युद्ध". या वाक्यातच कोल्हापूर - सातारा छत्रपतींच्या संबंधाचे सार सामावले आहे.
आजही दोन्ही घराण्यातील विद्यमान वंशजांना एकमेकांप्रति आदरभाव आहे.

संदर्भ : करवीर रियासत

निकाल नक्की लागणार तरी कधी; नव-नवीन तारखा मुळे पालक वर्ग वैतागले...?

निकाल नक्की लागणार तरी कधी; नव-नवीन तारखाने पालक वर्ग वैतागले...?


परत आली नवीन तारीख

वार्षिक पेपर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मोठं शिखर.
 मार्च महिना आला की सर्व घरातील मोठी माणसं प्रत्येक विद्यार्थ्याला जाता येता एकच सपाटा लावलेला असतो तो म्हणजे अभ्यास कर...अभ्यास कर....
 आम्ही विद्यार्थी चढाओढीने अभ्यास करायचं एकदा काय पेपर संपले की मामाचं गाव काय
 कैरी काय...
 आंबे काय...
 मॅच काय...
 कॅरम बोर्ड काय...
 मजाच मजा
 शाळेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक महापूजा संपल्यावर सरांनी सर्वांना मोठ्याने सूचना दिली.
 पेपर संपले असून उद्यापासून शाळेला सुट्टी असेल अजून एक सूचना सरांनी दिली ती म्हणजे आपला वार्षिक निकाल एक मे रोजी लागणार आहे. निकालात किती मार्क पडतात?
आणि पहिला कोण येतो याची उत्सुकता तर विद्यार्थ्यांना असणारच..ना..
 01 तारीख जवळ येत असताना मोबाईल आणि टीव्हीवर एक बातमी येत होती.
 आता गावाला कसं जायचं?
 तसं तर दरवर्षी निकालाची तारीख आतापर्यंत 01 मे ही एकच असायची. 
पण शाळेकडून,शिक्षण विभागांकडून सारखी नव-नवीन तारीख मिळू लागली आहे.

 त्यात आता सकाळी समजले की निकाल आता 06 मे ला लागणार असून असा फतवा शिक्षण संचालकाकडून निघत आहे. 
विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत नवीन नवीन तारखा मुळे 
विद्यार्थी पालक आणि शिक्षक ही चांगलेच वैतागले आहेत.
सध्या महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेची परीक्षा संपली असून निकाल कधी लागेल याची वाट पाहत असताना शिक्षण विभागामार्फत 20 एप्रिल 2023 रोजी नवीन अध्यादेश आला.
 की 29 एप्रिल 2023 रोजी सर्व शाळेचा निकाल जाहीर होणार 
अथवा सुट्टीच्या कालावधीत जाहीर करा 
अशी सूचना दिल्या.
स्थानिक परिस्थिती व कडक उन्हाचा विचार करून निकाल घरपोच करण्याची जबाबदारी संबंधित शाळा,शिक्षक व प्रशासनावर सोपवली 
आणि 2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळा सुट्टी जाहीर केली.


व नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2023 पासून सुरू होणार
 निकाल जरी 29 तारखेला असला तरी शिक्षकांना 5 मे पर्यंत शाळेत येण्याचे बंधन होते
 06 मे पासून सर्व शिक्षकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या 
असे असताना 
प्राथमिक शिक्षण संचालकांनी पुन्हा एकदा 28 एप्रिल 2023 रोजी 2 रा अध्यादेश काढून राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर 06 मे 2023 रोजी शाळेचा निकाल जाहीर करण्याचा फतवा काढला आहे.
 यामुळे शिक्षक पालकांसमोर तोंडघशी पडली आहे.
 या रोजच्या निर्णयाच्या निर्णयाने पालक,शिक्षक आणि विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत.
 01 मे चा निकाल घेऊन गावाला जाण्याचे पालकांचे स्वप्न अधांतरीत राहिले.

01 तारखेच्या निकालावर सर्व गोष्टींचे नियोजन होत असते.
 निकाल न घेता गावी जाणे म्हणजे विद्यार्थ्यांना नाराज करणे...
असे होईल.
 या सर्व गोष्टींवर पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 शेवटी शिक्षकांना पण वरिष्ठांचे ऐकावेच लागणार...
आणि पालकांना शिक्षकांची सुद्धा.....

 असो निकाल चांगलाच लागणार सुट्टीही चांगलीच जाणार 

सुट्टीचे काय एक दिवस मागेपुढे होईल 
पण विद्यार्थ्यांना थोर व्यक्तीमत्व आणि समाजासाठी आयुष्य वेचणारे 
समाज सुधारक यांची माहिती 
असणे पण तितकेच महत्त्वाचे आहे....

Saturday, 29 April 2023

आजच्या महत्त्वाच्या बातम्या रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३

मुलांना शिस्त लावण्याचे भारदस्त उपाय,कारण मुलांची वागणुकच ठरवते पालकांचे संस्कार!


मुलांना शिस्त लावण्याचे भारदस्त उपाय,कारण मुलांची वागणुकच ठरवते पालकांचे संस्कार!

प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांची वागणुक चांगली असावी किंवा समाजात ती संस्कारी घरातील मुलं म्हणून वावरावीत.
 शिवाय चांगली शिस्त लावल्यास मुलं चांगलं शिकून मोठं होतील, आई-वडिलांचं नाव मोठं करतील आणि एक चांगला माणूस म्हणून पुढे येतील. 
तुम्हालाही आपल्या मुलांना लहान वयातच चांगली शिस्त लावायची असेल तर एक्सपर्ट्सनी सांगितलेले हे उपाय तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतात.
मुलांना शिस्त लावणे हे कोणत्याही पालकांसाठी एक मोठे दिव्य कामच असते.
 कारण ही गोष्ट दिसायला जरी सोपी असली तरी जास्त अवघड असते. 
पालकांना वाटते की मुलांना मारून,धाक दाखवून,ओरडून आपण त्यांना शिस्त लावू शकतो पण काळानुसार आता ही पद्धत मागे पडत चालली आहे.
 आताच पिढी ही जास्त संवेदनशील आणि हुशार आहे. अगदी लहान वयापासूनच त्यांना अनेक गोष्टी कळायला सुरुवात होते. आई बाबा आपल्याला कधी ओरडतात, कधी मारतात, ते खरंच रागवले आहेत की मस्करी करतायत अशा अनेक गोष्टी मुले चटकन ओळखतात.
त्यामुळे आताच्या मुलांना शिस्त लावायची म्हणजे त्यांच्या कलानुसार घेऊनच तुम्हाला वागावे लागेल. आज या लेखातून आम्ही तुम्हाला जाणकारांनी दिलेल्या काही टिप्स देणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांना चांगली शिस्त लावून एक चांगला व्यक्ती म्हणून मोठे करण्याचा प्रयत्न नक्की करू शकता.
🟣मुलांना समजून घेणे-------

मुलांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
 काही पालकांच्या रागाचा पारा खूप जास्त असतो आणि त्यांच्यात जोरजोरात ओरडण्याची आणि भांडण्याची एक सवय निर्माण होते. 
लहान सहान गोष्टींवर सुद्धा काही आई किंवा वडील खूप आकांड-तांडव करतात. 
कधी कधी आपल्याच मुलावर सुद्धा राग काढतात. मुले एक सवय म्हणून ही गोष्ट आत्मसात करत नसले तरी यामुळे त्यांच्या मनात आपल्या पालकांविषयी चुकीचे मत निर्माण होऊ शकते. 
या अशा ओरडण्याने, अपमानित भावनेमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होऊ शकते. 
अशी सवय असणाऱ्या पालकांनी ही सवय लवकरात लवकर सोडून द्यावी आणि मुलांशी प्रेमाने वागावे.

🟣बोलून प्रश्न सोडवा-----

मुलाने चूक केली की पालकांना राग येतो आणि ते मारून त्याला समजवायला जातात.
 पण ही पद्धत चूक आहे. 
जेव्हा पालक मुलाला ओरडतात किंवा त्यांच्यावर हात उचलतात तेव्हा मुलही तसेच वागण्याचा प्रयत्न करते.
त्याच्या मते आपले पालक असे वागतात म्हणजे हा मार्ग योग्य आहे
 असे त्यांना वाटते. मुल हे आपल्या पालकांचेच अनुकरण करते हे तर आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे.
 कधी कधी मुले या अपमानाचा बदला इतरांवर काढतात आणि आपल्या पेक्षा कमी ताकदवान मुलांना लक्ष्य करून जे पालक त्यांच्याशी वागले अगदी तसेच वागतात. 
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी असे वागणे सहसा टाळावे आणि चर्चा करण्यावर भर द्यावा. मुलांशी बोलण्याने अनेक प्रश्न आणि समस्या सहज सुटू शकतात.

🟣टाईम आउट रूल----

अमेरिकन अकेडमी ऑफ पीडियाट्रिक्‍स यांनी एका संशोधनातून हा खास रूल पुढे आणला होता. 
यानुसार पालकांनी मुलांना ताकीद द्यावी. 
म्हणजे समजा त्याने पहिल्यांदा चूक केली तर त्याला समजून घ्यावे, दुसऱ्यांदा चूक केली तरी समजून घ्यावे. पण तिसऱ्यांदा चूक केल्यावर त्याला सौम्य प्रमाणात का होईना शिक्षा करावी.
 पण मुल तिसऱ्यांदा चूक करणारच नाही यासाठी त्याला तशी सक्त ताकीद द्यावी.
 हाच आहे टाईम आउट रूल! हाच रूल अनेक मुलांसाठी प्रभावी असल्याचे सुद्धा दिसून आले आहे.

🟣त्यांना प्रोत्साहन द्या-----

ही अशी गोष्ट आहे जी करायला अनेक पालक विसरतात.
 त्यांचे मते केवळ मुलांना शिस्त लावणे एवढेच आपले काम आहे. 
पण नाही ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे.
 पालक मुलांनी चुक केली की ओरडतात पण तेच मुल जेव्हा ती चुक सुधारते किंवा चांगले वागू लागते तेव्हा मात्र त्याची स्तुती करत नाही, त्याला प्रोत्साहन देत नाही.
 असे करणे दुटप्पीपणाचे ठरते आणि मुलाची देखील अपेक्षा असते 
की आपण जी चुक आता करत नाही ती पालकांच्या लक्षात येवो
 आणि त्यांनी त्याबद्दल शाबासकी द्यावी.
 मुलांना जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासती प्रोत्साहन देता
 तेव्हा त्या मुलांना देखील त्या गोष्टी करण्यात अधिक हुरूप येतो 
आणि त्यामुळे मुल आधी चांगल्या प्रकारे सुधारते.

🟣खोट्या धमक्या देऊ नका-----

अनेक पालक आपल्या मुलांना खोट्या किंवा पोकळ धमक्या देतात. 
जसे की तू असे नाही केलेस तर मी तुला मोबाईल देणार नाही किंवा खेळायला पाठवणार नाही. 
पण साहजिकच या धमक्या पोकळ असल्याने ना पालक त्या सिरीयसली घेतात ना मुले घेतात आणि कुठेतरी मुलांना त्याची सवय होऊन जाते. 
त्यांना वाटू लागते की आपले पालक फक्त ओरडतात, 
बाकी काही करत नाही. 
त्यामुळे अशी सवय सोडा आणि त्या ऐवजी सामंजस्याने त्यांना समजवा.
 बऱ्याचदा प्रेमाने समजावलेल्या गोष्टी मुले लगेच ऐकतात.

मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत?

मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत?

संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त.
 प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते.
 सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.
१. मुलांना स्ववलंबी बनवणे------

लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे.
 झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे.
सुरुवातीला नीट येणार नाही; पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय रहाणार नाही.
सकाळचे आन्हीक उरकल्यावर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवावी.
अभ्यासाची पुस्तके, वह्या निटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे वळण लावावे.
शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दप्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे.
कपड्याचे बटण अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांचे त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही आनंद वाटतो.
 वयानुसार स्वतःचे कपडे धुवायलापण शिकवावे.
सकाळ-दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. 
थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे. त्यात मुलगा-मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले, तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी, ते नेटकेपणानेच वागेल.
२.वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे-------

सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना 
अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने
 दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. 
तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे.
 कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणवून घ्यावी.
तसेच प्रत्येक गोष्ट ईश्वरकृपेनेच झाली, हे त्यांच्या मनावर बिंबवावे.
३. लवकर निजणे व लवकर उठणे-------

लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी. 
पुष्कळ घरांतून बघायला मिळते की, मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी ८-९ वाजता उठतात. 
याउलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात रहातो. 
‘लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धन-संपत्ती मिळे ।’, असा श्लोक आहे.
पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत.
रात्री रज-तमाचे प्राबल्य असते.
 याउलट पहाटे सात्त्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.
४. प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे--------

मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी.
 ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. 
त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. 
पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. 
तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, 
तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही.
 घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे.
५. मुलांचे अती लाड करणे टाळणे------------

आजकाल घरांतून एखाद-दुसरेच मूल असल्याने त्यांची आवड-नावड जपली जाते. 
जेवण, कपडे सर्वच बाबतींत ‘मुले म्हणतील ती पूर्व दिशा’, असे आढळून येते.
 लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की, 
मुले पुढे ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अती लाड करू नयेत.
६. मुलांपुढे स्वत:चा आदर्श ठेवा!--------

घराचे ‘सत्यं शिवं सुंदरम्’ करायचे असेल, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे, हे सर्व करता आले पाहिजे.
 मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की, 
आपले वळण, शिस्त बघून आपले मूलही आपले अनुकरण करील.
 असे झाले, 
तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही.