माझी शाळा माझे उपक्रम
01 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपण वर्षभर केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक Teachers Celebration-13 च्या माध्यमातून आज आपल्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने पार पडला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून वर्षभरात नवनवीन उपक्रम,कार्यक्रम शिक्षक-पालक यांची भेट अथवा दिवाळी पहाट कार्यक्रम असो,
मुलांसाठी कला-क्रीडांगण अथवा मुलांसाठी बाह्य परीक्षांचे आयोजन असो.
या सर्व कार्यक्रमात पालक विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा.
यासाठी कित्येक दिवसापासून शिक्षकांचे नियोजन सुरू असते. यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव, कार्यक्रमाची ध्येय पूर्ण करण्याची तळमळ असते.
त्यामधून मिळणारा आनंद नव-नव्या कल्पनांना उजाळा देत असतात. अशाच या ध्येयवेड्या शिक्षकांसाठी आज Teachers Celebration-13 याचे आयोजन करण्यात आले होते.
एकाच दिवशी सर्वांचे वाढदिवस या उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतो.
कारण वर्षभर प्रत्येक जण आपल्या शालेय कामकाजात व्यस्त असतो. सर्वजण एकाच वेळी अशा या कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही.
हा कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांचा आनंद द्विगुणीत करावा इतकाच आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे एकत्र येणे,नवीन संकल्पना, नवीन कल्पना मांडणे,विचारांची देवाण-घेवाण करणे येणाऱ्या नवीन वर्षासाठी नियोजन करणे.
या सर्व गोष्टी आनंदमय वातावरणात पार पडतात.
ज्या प्रकारे मुलांचे दुसरे आई-वडील शिक्षक असे म्हणतात.
त्याच प्रकारे समाजातील विविध घटकांना पुढे घेऊन जाण्याचे काम शिक्षक करत असतात अशा कार्यक्रमाने सर्व हेवे-दावे बाजूला करून विद्यार्थ्यांचे विकास जलद मार्गाने पूर्ण करता येतात.
शिक्षक हे केवळ पगारदार कर्मचारी नसतात........
शिक्षकाची भूमिका एखाद्या प्रशिक्षकासारखी असते जो आपल्या मुलांना ऑलिम्पिकसारख्या खडतर स्पर्धात्मक खेळासाठी तयार करतो. पण शिक्षकाला हेही माहीत आहे की या गेममध्ये प्रत्येकाला एकाच ठिकाणी जायचे नाही.
यापैकी बरेच जण चांगले प्रेक्षक बनवतील.
त्यापैकी काही लेखक होतील.
त्यांच्यामध्ये अशी मुले आहेत जी संगीताच्या विश्वात आपले नाव उज्ज्वल करतील तर अशी ही मुले आहेत जी शिक्षक बनण्याची आणि इतर मुलांची स्वप्ने पूर्ण करण्याची भूमिका स्वीकारतील.
म्हणजेच शक्यतेच्या दारापलीकडे जाणारा माणूस घडवण्याच्या भूमिकेत शिक्षक नेहमीच समर्पणाने गुंतलेला असतो, तो केवळ पगारदार नसतो.
शिक्षक हा केवळ पुरस्कार आणि दर्जा मिळविण्याचा आकांक्षी नसतो, तर तो खऱ्या अर्थाने दूरदर्शी असतो आणि भविष्य घडवण्यात आणि त्यात बदल करण्यात आपली भूमिका सहज ओळखतो.
कितीही अडचणी आल्या तरी तो या मार्गापासून कधीच पाठ फिरवत नाही.
कारण भविष्यातील अकल्पनीय आव्हानांसाठी अंधाराशी लढणाऱ्या पिढीला तयार करणे हे त्याचे काम आहे, ज्या आव्हानांचा तो फक्त अंदाज लावू शकतो.कारण ते भविष्याच्या कुंडात आहेत, म्हणून तो आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि त्यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करण्यास आणि जगण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करतो.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक नेते तयार करतात,अनुयायी नाहीत.
नेता होण्यासाठी आणि नेतृत्व कौशल्य शिकवण्यासाठी आपण स्वतः नेतृत्व करणे आवश्यक आहे.
यासारखे उपक्रम आपणही साजरे करावे.
जेणेकरून शिक्षकातील प्रेम-आनंद द्विगुणीत करता येईल व नवीन करण्याची प्रेरणा मिळेल.
राहुल दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
(RDM_SMS)
No comments:
Post a Comment