Monday, 15 May 2023

लाखो विद्यार्थी आधाराविना;लिंक प्रक्रिया समाप्त

लाखो विद्यार्थी आधाराविना;लिंक प्रक्रिया समाप्त

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची माहिती जमवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या आधार कार्ड लिंक करण्याच्या उपक्रमाची मुदत संपली आहे.
या मुदतीनंतर ही तब्बल 13 लाख 42,752 विद्यार्थी आधार कार्ड आणि सरळ पोर्टलवरील नोंदणीत विसंगती आढळून आली.
 तर 3 लाख 91 हजार विद्यार्थी आधाराविना असल्याची माहिती समोर आली आहे.
 विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अध्यायावत करून त्यांची लिंक जोडण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.

 मात्र माहिती दडवून ठेवल्याने अनुदानित शाळातील अनागोंदी समोर येण्याची शक्यता आहे राज्यातील अनुदानित सरकारी शाळांमध्ये 2 कोटी 13 लाख 78 हजार 278 विद्यार्थी शिकत असून त्यांच्या आधार कार्ड जोडून लिंक करण्यासाठी शाळा आणि शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.

त्यात युआयडीआय कडे पडताळणीसाठी पाठवल्यानंतर केवळ 84.9% विद्यार्थ्यांचे आधार वैद्य ठरले आहेत तर 9.42% विद्यार्थ्यांचे आधार अवैध असून 6.40% विद्यार्थ्यांच्या आधारावरील माहिती विसंगती आढळले आहेत.
 दुसरीकडे अनुदानित शाळांमध्ये हजेरीपटावर दाखवण्यात येत असलेल्या तब्बल 3 लाख 91 हजार 47 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्याची माहिती शिक्षण विभागाने उपलब्ध झाली आहे.
 विद्यार्थ्यांचे आधार लिंक केल्यानंतर त्या आधारावरच हे सर्व काम शिक्षकांनी करण्याचे सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत मात्र या नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचा दावा शिक्षकांकडून केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

🟣संच मान्यता लांबणीवर पडण्याची शक्यता----
राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत अनागोंदी असल्याने आधार कार्ड लिंक करण्यासाठी दिरंगाई होत आहे त्यामुळे शिक्षण विभागाकडून केली जाणारी शिक्षकांची संच मान्यता लांबीवर पडण्याची शक्यता आहे तर संच मान्यता झाल्यास आधार नोंदणी नसल्याने शेकडो शिक्षकांचे नोकऱ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment