Sunday, 14 May 2023

जगातील सर्वात मोठे धरण कोणते?

जगातील सर्वात मोठे धरण कोणते?

थ्री गॉर्ज डॅम चीनमधील सर्वात मोठं धरण आहे.
 यांगत्सी नदीवर असलेलं हे धरण फुटलं तर यामुळे जवळपास 5 कोटी लोकसंख्येला फटका बसू शकतो. तसंच हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. 
गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
चीनच्या जल संधारण मंत्रालयाच्या यांगत्सी नदी जलविज्ञान समिती आणि चीन थ्री गोर्ज ग्रुपने सांगितलं की,धरण ओव्हर फ्लो होण्यापासून वाचवण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले होते.
या धरणाची उंची 185 मीटर आहे.
 पाण्याची पातळी 163.5 मीटरपर्यंत पोहोचली होती. काही माध्यमांनी असाही दावा केला आहे की,
धरणातून पाणी सोडण्यात येत असताना धरणाच्या काही भागाचं नुकसान झालं आहे.
सरकारकडूनही धरणाचे थोडेसे नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
जगातील सर्वात मोठं धरण असलेल्या या डॅमचे रुंदी अडीच किलोमीटर इतकी 
तर उंची जवळपास 630 फूट इतकी आहे.
जगातलं सर्वात मोठं हायड्रोइलेक्ट्रिक धरण म्हणून या डॅमला ओळखलं जातं.
या धरणामुळे यांगत्सी नदीच्या 1 हजार किमीपर्यंत पूरपरिस्थिती निर्माण होते.
 थ्री गोर्ज डॅम फुटल्यास चीनमधील 24 राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल.
हे वाचा - आइनस्टाइन आणि चार्ली चॅप्लिन भेटल्यावर काय बोलले थ्री गोर्ज डॅमबाबत अनेक अद्भुत अशा गोष्टी सांगितल्या जातात. याच्या बांधकामासाठी इतकं लोखंड वापरलं आहे ज्यामध्ये 60 आयफेल टॉवर तयार होतील.

या डॅमबाबत आणखी एक दावा केला जातो. धरणातील पाणी पातळी जेव्हा कमाल उंचीवर पोहोचते त्यावेळी पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होतो असा दावा करण्यात येतो. 
आतापर्यंत याबाबत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.
 मात्र जेव्हा धरण पूर्ण क्षमतेनं भरतं तेव्हा 42 बिलियन टन इतका पाणीसाठा असतो.
 याचा परिणाम पृथ्वीवर होतो. 
यामुळे एक दिवस 0.06 मायक्रो सेकंदांनी वाढतो असं म्हटलं जातं.

No comments:

Post a Comment