Saturday, 6 May 2023

तुम्ही बुलडोजर पेरेंट आहात का?

तुम्ही बुलडोजर पेरेंट आहात का?

कोणत्याही पालकाला आपल्या मुलाने यशस्वी व्हावे असे वाटणे स्वाभाविकच आहे.
त्यासाठी मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी पालक प्रयत्नही करत असतात.
 मात्र मुलांच्या भवितव्याचा मार्ग सुलभ सुखकर व्हावा यासाठी त्यांना मदत करणे आणि त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊच नये यासाठी सतत तप्तर राहणे यात फरक आहे.
याच आधारावर सध्याच्या मॉडेल पालकत्वाच्या युगात नव्याने रूढ होत चाललेली एक पालकत्व शैली म्हणजेच बुलडोजर पॅरेटिंग जसे रस्त्यातील अडथळे दूर करत पुढे जातो.
तसेच हेही पालक मुलांच्या आयुष्यातील छोटे-मोठे अडथळे दूर करण्यासाठी सदैव तप्तर असतात.
पालकांचे हे वागणे केजी ते पीजी वयोगटातही लागू असतात.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
हे बुलडोझर तर पालक नेमके असतात तरी कसे---
💥 बुलडोजर पालखे मुलांच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी सतत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल होतात.
💥 मुलांची अगदी छोट्यातल्या छोट्या प्रॉब्लेम ते आधीच सोडवतात.
💥 असे पालक मुलांना सतत प्रोटेक्ट करतात.
💥 हे पालक मुलांचे शिक्षक कोच यांनाही सतत अडथळ्यांबाबत सुचित करतात.
💥 मुलांचे भविष्य मुलांचे यश त्यासाठीची स्ट्रॅटर्जी याच विषयी सतत विचार करतात.
💥मुलांच्या मित्रांच्या बरोबरच्या भांडणात हे मुलांच्या आधी पुढे सरसावतात.
💥मुलं वस्तू विसरतील या भीतीने ते मुलांचे दप्तर भरतात मुले मोठे झाली तरीही.
💥असे पालक मुलांना कोणताही भौतिक सेवा देण्यात मागे पडत नाहीत.
💥मुलांना कोणतीही गोष्ट मागण्या आधीच ती पुरवण्याकडे यांचा कल असतो.
💥असे पालक मुलांसाठीची ध्येय आपण स्वतःच ठरवतात.
💥 हे पालक मुलांना अनावश्यक व अति प्रमाणात सोयी सुविधा पुरवतात.
💥 परीक्षेतील गुणांना...फक्त यशालाच असे पालक आवश्यक महत्त्व देतात.
💥मुलांच्या पुढे प्रश्नच उभे राहू नये यासाठी आधीच प्रश्नांची उत्तरे सोडवतात.
💥 धावपळीत वेळ वाचण्यासाठी असे पालक शॉर्टकट वापरतात
💥 वेळ खाऊ पण काढण्यासाठी रेडीमेड पॉलिसी वापरतात
💥दुसऱ्यांवर विश्वास जास्त ठेवतात.
लोकमत

No comments:

Post a Comment