Friday, 26 May 2023

फेवीक्वीक (Fevikwik) बाटलीच्या आत का चिटकत नाही?

फेवीक्वीक (Fevikwik) बाटलीच्या आत का चिटकत नाही?
फेव्हिक्विक कंटेनरवर चिकटत नाही

होय ते बरोबर आहे.
कारण फेविक्विक मधे ऑरगॅनिक सॉल्व्हेंट्समध्ये विरघळलेले सायनोक्रिलेट पॉलिमर असते जे त्याला बाटलीला चिटकन्यापासून रोखते.

पण जेव्हा ह्या ऑरगॅनिक सॉल्व्हेंटचे बाष्पीभवन होते तेव्हा फेविक्विक बाटलीच्या पृष्ठभागावर चिकटते.

जेव्हा फेविक्विक बाटली मधे असते तेव्हा त्याचं हवेशी संपर्क नसतो व ऑरगॅनिक सॉल्व्हेंटचे बाष्पीभवन पण होत नाही, त्यामुळे ते बाटलीला चिटकत नाही.

पण जर आपण बाटली फार काळासाठी उघडी ठेवली तर मात्र ऑरगॅनिक सॉल्व्हेंटचे बाष्पीभवन होईल आणि फेविक्विक हवेशी प्रतिक्रिया करेल आणि हळू हळू बाटलीला चिटकुन बसेल ..

त्यामुळे फेविक्विक बाटलीला नाही चिटकत हे समजून फार काळ बाटली उघडी ठेवू नका..

No comments:

Post a Comment