Tuesday, 9 May 2023

🟣👆कोरोना काळात दिलेल्या त्या ९० शिक्षकांच्या मान्यता धोक्यात;शिक्षण सचिव घेणार निर्णय

शिक्षक

सोलापूर शहरातील 11 शाळांमध्ये 18 शिक्षकांना तर उत्तर सोलापूर दोन,दक्षिण सोलापूर,10 माळशिरस तीन माढा चार,मंगळवेढा व सांगोल्यातील प्रत्येकी सात बार्शी तालुक्यात सहा करमाळ्यात चार मोहोळ तालुक्यात सहा पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक सोळा आणि अक्कलकोट तालुक्यात सात असे एकूण 90 शिक्षकांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. 
आहे त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला तक्रारी शिक्षण संचालक उपसंचालक आपण गेल्या राज्यात शिक्षक भरतीला मान्यता नसतानाही शिक्षण अधिकाऱ्यांनी तब्बल 90 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता दिली आहेत.
विशेष म्हणजे कोरोना निर्बंधामुळे पुणे नगरसह इतर जिल्ह्यांमध्ये भरती झाली नाही.
 पण सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने या मान्यता दिली आहेत.
 राज्य सरकारचा 4 मे 2020 रोजीचा निर्णय त्यांनी डावलला शिक्षण उपसंचालक आणि त्या सर्वांचे प्रस्ताव पडताळून पाहिले त्यानंतर त्यात गंभीर बाब समोर आल्यानंतर त्यांचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाकडे पाठविण्यात आला आहे.
 आता त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे
🟣मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय--- 
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारच्या 04  मे 2020 रोजी एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार शिक्षक भरती सह सर्वच विभागातील नवीन पदा भरतीवर निर्बंध घालण्यात आले तरी पण सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी एक दोन नव्हे तब्बल 90 पदांना मान्यता दिली.
 मान्यतेच्या प्रकारात लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आणि कानी केला त्यानंतरचा त्यासंबंधीचा अहवाल शिक्षण उपसंचालकांनी मागून घेतला आहे.
🟣मान्यतेतील गंभीर बाबी----
💥 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता नसतानाही दिली मान्यता
💥 टीईटी उत्तीर्ण नाही तरीपण शिक्षण अधिकाऱ्यांकडून संबंधितांना मान्यता
💥 खुल्या एनटी प्रवर्गाच्या जागा नसतानाही आरक्षित जागेवर इतर संवर्गातील उमेदवारांना मान्यता
💥 रिक्त पद एक विषयाचे अन मान्यता दुसऱ्याच विषयाचे शिक्षकाला
💥 बिंदू नामावली सादर न करता तुकडीला मान्यता नसतानाही शिक्षक पदी दिल्या मान्यता
राज्यातील शिक्षक भरतीवर निर्बंध असतानाही सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 90 जणांना मान्यता दिली.
त्यांची शालार्थ मान्यता अडवली असून वेतनही थांबवले आहे त्या शिक्षकांच्या बाबतीत आता शालेय शिक्षण विभागाचे सचिव निर्णय घेतील त्यासंबंधीचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयाला पाठविला आहे.
औदुंबर उकिरडे
 उपसंचालक
 माध्यमिक शिक्षण पुणे

राज्य सरकारच्या निर्णयानुसार पदभरती निर्बंध असतानाही सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वर्षात तब्बल 90 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता दिल्याची बाब आता उघड झाली आहे शिक्षण उपसंचालक आणि त्या शिक्षकांची सलार्थ मान्यता अढवली आहे त्या शिक्षकांची करायचे काय यासंबंधीचा निर्णय घ्यावा असा प्रस्ताव शिक्षण सचिवांकडे पाठविण्यात आलेला आहे.

सकाळ सोलापूर

No comments:

Post a Comment