Wednesday, 3 May 2023

आंबा खाल्यानंतर लगेच सॉफ्टड्रिंक किंवा कोल्ड्रिंक्स पिल्यास मृत्यू होतो का?

आंबा खाल्यानंतर लगेच सॉफ्टड्रिंक किंवा कोल्ड्रिंक्स पिल्यास मृत्यू होतो का?

आंबा खाल्ल्यावर कोल्डड्रिंक पिऊ नका ! काही प्रवासी चंडीगढ़ येथे फिरावयास गेले होते.
त्यांनी आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्डड्रिंक प्याले.
 त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते सगळे बेशुद्ध होऊ लागले.

स्त्रोत: गुगल विकी

उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथे त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले.
 डॉक्टरांनी सांगितले,की आंबा खाल्ल्यानंतर कोणतेही कोल्डड्रिंक किंवा सॉफ्टड्रिंक पिऊ नये. 
आंब्यातील सायट्रिक अॅसिड आणि कोल्डड्रिंकमधील कार्बनिक अॅसिड एकत्र मिसळल्यामुळे शरीरात विष तयार झाले. 
कृपया हा मॅसेज आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत पोचवा. सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे.” असे हा दावा सांगतो.
आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्याने चंदिगढ येथे फिरावयास गेलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला असे व्हायरल पोस्ट मध्ये म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही शोध घेतला. 
व्हायरल पोस्ट मध्ये कुठले प्रवासी चंदीगढला गेले होते.
 ते किती होते आणि त्यांचा कुठे मृत्यू झाला याबद्दल काहीही लिहिलेले नाही.
 शिवाय डॉक्टरांनी सांगितले असा उल्लेख असला तरी डॉक्टरांचे नाव नमूद करण्यात आलेले नाही.
 यासाठी आम्ही किवर्ड च्या माध्यमातून अशी कोणती घटना घडली आहे का?
 याचा शोध घेतला, मात्र काहीच हाती लागले नाही.
चंदिगढ मध्ये अशी कोणतीही घटना घडल्याची माहिती देणारे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स किंवा बातम्या आम्हाला सापडल्या नाहीत.

आंबा आणि शीतपेयांच्या मिश्रणातून अथवा एकत्रित सेवनातून नेमके असे घडू शकते का?
 याचा आम्ही तपास केला.
 आम्हाला ने १७ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केलेला एक लेख सापडला. यामध्ये आंब्याचे रासायनिक गुणधर्म आम्हाला वाचायला मिळाले.
 “आंब्यामध्ये मॅलिक आणि सायट्रिक ऍसिड सारखी सेंद्रिय ऍसिडस् असतात, जे आंब्याच्या फळांच्या आंबटपणाचे प्रमुख कारण आहेत.
त्यांनी सांगितले,”सिट्रिक अ‍ॅसिड आणि कार्बोनिक अ‍ॅसिड यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. 
या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. 
असं केल्यावर काही लोकांना अपचन किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण लगेच त्यामुळे कोणाचा मृत्यू होणार नाही.”
आंबा खाल्ल्यानंतर लगेच शीतपेयांचे सेवन शरीरासाठी घातक आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नसल्याचे आम्हाला दिसून आले.
अशाप्रकारे आमच्या तपासात आंबा खाऊन शीतपेये पिल्यास मृत्यू होतो असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला आहे.

No comments:

Post a Comment