Monday, 15 May 2023

मोबाइल फोन बंद करुन पुन्हा सुरु केल्यानंतर (रिस्टार्ट) नेमकं काय होतं?

मोबाइल फोन बंद करुन पुन्हा सुरु केल्यानंतर (रिस्टार्ट) नेमकं काय होतं?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रिस्टार्ट म्हणजे मोबाईलला पूर्णपणे बंद करून परत चालू करणे असा होतो, आणि स्विच ऑफ म्हणजे आपण जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत मोबाईल सुरू होत नाही.

@रिस्टार्ट कशासाठी करावे लागते----------

मोबाईल अपडेट करताना सिस्टीम लेवल ला व्यवस्थित बदल होण्यासाठी.
मोबाईल मधील ॲप क्रॅश होत असतील, फोनचा परफॉर्मन्स कमी झाला असेल,हँग होत असेल अशा वेळेस.
फोन मधील किंवा फोनला जोडलेले एखादे हार्डवेअर डिवाइस काम करत नसेल अशा वेळेस.
बॅटरी लवकर कमी होत आहे असे जाणवल्यास चालू असलेले किंवा बॅकग्राऊंड ॲप्स बंद करण्यासाठी.
तात्पुरती मेमरी भरली आहे असे जाणवल्यास ती रिकामी करून फोनचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी.
रिस्टार्ट प्रक्रियेमध्ये काय काय होते

@रिस्टार्ट दाबल्यानंतर---------

पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टम (कर्नल) कडे सर्व एप्लीकेशन बंद करण्याची विनंती केली जाते.
ही सर्व एप्लीकेशन रॅम मध्ये बॅकग्राऊंड प्रोसेसच्या स्वरूपात काम करत असतात.
एप्लीकेशन बंद करण्यापूर्वी ते सध्या करत असलेला कामाचा स्टेटस सेव्ह केला जातो,
 जेणेकरून फोन परत चालू केल्यानंतर तेथून पुढे काम करता येईल.
यासोबतच फोन मधील वेगवेगळी महत्त्वाची हार्डवेअर थोड्या कालावधीसाठी बंद केली जातात. 
त्यामध्ये रॅम, प्रोसेसर, डिस्प्ले, स्पीकर, वेगवेगळे सेन्सर्स, जीपीयू इत्यादीचा समावेश होतो.
सर्व बंद झाल्याची खात्री झाल्यानंतर फोन काही सेकंदासाठी बंद राहतो.
 त्यानंतर फोनला परत सुरु करण्याची कमांड दिले जाते आणि फोन सुरू व्हायला लागतो.

@परत फोन सुरू होताना-------
मोबाईलच्या रोम मेमरी मध्ये बूटस्ट्रॅप किंवा बूट लोडर नावाचा एक प्रोग्रॅम लोड/सुरु होतो. 
त्यानंतर हा प्रोग्रॅम ऑपरेटिंग सिस्टीमला लोड करतो, सर्व हार्डवेअर व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करतो.
या बूट लोड प्रोग्रॅम मध्ये बदल करून आपल्याला अँड्रॉइड फोन रूट करता येतो.
 ज्याच्यामुळे अँड्रॉइड फोन आपल्या मर्जीनुसार चालतो. त्यामुळे हा प्रोग्राम अत्यंत महत्त्वाचा आहे.
सर्व गोष्टी बूट लोडर द्वारे व्यवस्थित काम करत असल्या नंतरच फोन पुढे जातो अन्यथा काही अडचण असल्यास कंपनीचा लोगो दाखवत फोन कायम अडकून राहतो. या समस्येला बूटलुप असे म्हणतात.
फोन रिस्टार्ट व्यवस्थित झाल्यानंतर पूर्वी ओपन असलेले ॲप्स ची स्टेट परत लोड केली जाते आणि युजरला लॉक स्क्रीन किंवा डेस्कटॉप वापरण्यासाठी उघडला जातो.
रिस्टार्ट करणे फोन साठी फायदेशीर आहे परंतु त्यासाठी मोबाईलला खूप कठीण प्रक्रियेमधून जावे लागते त्यासाठी बरीच शक्ती खर्ची पडते. 
आठवड्यातून एकदा रिस्टार्ट करणे फोन साठी चांगले आहे. 🙂

माहिती संदर्भ : स्वज्ञानाने आणि [1] [2] [3]

[1] Booting process of Android devices - Wikipedia
[2] मोबाइल रूट करणे म्हणजे काय? चे Tech Studentने दिलेले उत्तर

No comments:

Post a Comment