Wednesday, 3 May 2023

पाठ्यपुस्तके महागली....... पालकांकडून जुन्या पुस्तकांची मागणी

पाठ्यपुस्तके महागली....... पालकांकडून जुन्या पुस्तकांची मागणी

🟣शालेय वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील वर्षांच्या पाठ्यपुस्तकांच्या खरेदीची लगबग सुरू झालीच दरम्यान ही खरेदी करताना मात्र महाविद्यालय पुस्तकामुळे पालकांच्या खिशाला अधिक ची कात्री लागत आहे.
यंदा पाठ्यपुस्तकाच्या किमतीत 25 ते 30 टक्के आणि वाढ झाल्याने पालकांकडून जुन्या पुस्तकाची मागणी वाढत आहे पाठ्यपुस्तके द्याना अशी विनंती केली जात आहे..
जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतींची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तकांना पालकांना बसत आहे.
 गेल्यावर्षी साधारणता 70 ते 80 रुपयांना मिळणारी पाठ्यपुस्तके यंदा 100 ते 115 रुपयांना तर यापूर्वी 140 ते 190 रुपयांना मिळणारे पुस्तके 170 ते 240 रुपयांना बाजारात उपलब्ध झालेली आहे.
सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विकलीसाठी उपलब्ध झाली आहेत.
 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंगळांकडून छापण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ झाली आहे.
 तसेच स्पष्टीकरण अद्याप बालभारतीने अधिकृतरित्या दिलेले नाही परंतु पाठ्यपुस्तक मात्र बाजारात आली आहेत.
 कागदाच्या वाढलेल्या किमती छपाईचा खर्च आणि वाहतूक त्यामुळे किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान काही विक्रेत्यांकडे मागील वर्षाच्या राखीव साठ्यातील पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत.
त्यामुळे पालकांकडून देखील याच साठ्यातील पाठ्यपुस्तकांची मागणी होत आहे.
🟣कागदाच्या किमतीत जागतिक स्तरावर वाढले आहेत. बालभारतीकडूनही पाठ्यपुस्तकाच्या किमती बाबत लवकरच चित्र स्पष्ट करण्यात येईल.
 कृष्णाकुमार पाटील 
संचालक महाराष्ट्र राज्य 
पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन 
मंडळ (बालभारती)

No comments:

Post a Comment