Thursday, 4 May 2023

जगातील 'सर्वात गरीब राष्ट्रपती' ही उपाधी कोणाला व का मिळाली आहे?

जगातील 'सर्वात गरीब राष्ट्रपती' ही उपाधी कोणाला व का मिळाली आहे?

राजकारणी जीवन कसे असावे याचा आधुनिक जीवनातील उरुग्वे देशाचे मा.अध्यक्ष होसे मुईका हे उत्तम उदाहरण आहेत. 
२०१० ते २०१५ या स्वत:च्या ५ वर्षाच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत देशाला भरभराटीला आणणारे अनेक निर्णय मुईका यांनी घेतले मात्र हे करत असताना स्वत: मात्र अत्यंत साधी किंबहुना गरीब जीवनशैली त्यांनी अंगिकारली.
मुईका यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये अलिशान राष्ट्रपती भवनामध्ये निवास केला नाही 
स्वत:च्या २ रूम असलेल्या सध्या घरात राहून
त्यांनी शेवटपर्यंत आपला कारभार पाहिला.
 आणि ते आपल्या पगारातील ९० टक्के रक्कम ही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत.
 शिक्षणापासून देशातील कोणीही वंचित नाही राहिले पाहिजे हे त्यांचे तत्व होते.

सुरक्षेसाठी २ पोलीस कर्मचाऱ्या व्यतिरिक्त त्यांनी इतर कुठली सुरक्षा घेतली नाही. जगभरातील प्रचंड भ्रष्ट्राचार करणाऱ्या राजकारण्याच्या काळ्या गर्दीत मुईका यांचे व्यक्तिमत्व निश्चितच त्यांच्या या असामान्य वागण्यामुळे आणि कर्तृत्वामुळे वेगळे ठरते.

No comments:

Post a Comment