Friday, 12 May 2023

एका विमानात दोन वैमानिक का असतात?

एका विमानात दोन वैमानिक का असतात?
तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की विमानात दोन वैमानिक असतात. मुख्य वैमानिक असेल तर सहवैमानिक.
 विमानात दोन पायलट असण्याचं मुख्य कारण प्रवाशांची सुरक्षा असल्याचं मानलं जातं.

स्त्रोत: गुगल विकी

ज्याप्रमाणे एका ट्रेनमध्ये दोन मोटरमन असतात आणि दोघांनाही स्वतंत्र सीट असतात,त्याचप्रमाणे प्रत्येक विमानात एक पायलट आणि एक को-पायलट असतो.
 त्यांच्या जागाही वेगवेगळ्या आहेत.
 जेव्हा जेव्हा वैमानिक आणि सहवैमानिक यांना जेवण दिले जाते, तेव्हा ते कधीही एकसारखे दिले जात नाही.
 या दोन्ही वैमानिकांसाठी जेवणही वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जाते. त्यामागे मोठं कारण आहे.

खरेतर दोन्ही वैमानिकांना एकच आहार न देण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही वैमानिकांना समान आहार दिला गेला आणि जेवणात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर दोन्ही वैमानिकांचे आरोग्य बिघडेल.
 अशा परिस्थितीत दोन्ही वैमानिकांना उपचारांची गरज भासणार मग अशावेळी विमान कोण उडवणार, हा त्या वेळचा सर्वात मोठा प्रश्न असेल.
एकाच वेळी दोन वैमानिकांची प्रकृती बिघडल्यास प्रवाशांची सुरक्षा सर्वाधिक धोक्यात येऊ शकते.
 अशी समस्या सुटत नाही,त्यामुळे विमान कंपन्या ही खबरदारी लक्षात घेऊन दोन्ही वैमानिकांना वेगवेगळे जेवण देतात.

No comments:

Post a Comment