Wednesday, 24 May 2023

धरणाची क्षमता कशी मोजली जाते? तसेच बॅक वॉटर कुठे पर्यंत जाईल हे कसे ठरवले जाते?

धरणाची क्षमता कशी मोजली जाते? तसेच बॅक वॉटर कुठे पर्यंत जाईल हे कसे ठरवले जाते?
धरणात असलेला पाणीसाठा मोजण्यासाठी आणि त्यातून सोडण्यात येणारं पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जातात. पाणीसाठा मोजला जातो तो टी.एम.सी. आणि द.ल.घ.मी. मध्ये. ‘टीएमसी’ म्हणजे अब्ज घनफूट, तर ‘दलघमी’ म्हणजे दहालाख घनमीटर.
नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी ‘क्युसेक्स’ व ‘क्युमेक्स’ ही परिमाणं वापरतात. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’, तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’.

धरणाच्या दारातून किंवा एखाद्या बंधार्‍यावरून एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहतं आहे, हे यावरून कळतं. या वेगानं पाणी किती वेळ सोडलं जातं, त्यावर त्या धरणातून किती पाणी बाहेर पडलं हे ठरतं.

फुटाशी संबंधित असलेलं ‘क्युसेक्स’ हे परिमाण सध्या प्रचलित आहे, पण मीटरशी संबंधित असलेल्या ‘क्युमेक्स’चा वापर आता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

धरणातील पाणी आवक जावक मापे, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां?

स्थिर पाणी मोजण्याची एकके –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर
4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)

1) टीएमसी (TMC) म्हणजे काय ?

एक टीएमसी म्हणजे One thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट. 1 टीएमसी = 28,316,846,592 लिटर्स.

2) क्यूसेक (Cusec) म्हणजे काय ?

1 क्यूसेक (Cusec)– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.

उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.
म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

3) क्युमेक (Cumec) म्हणजे काय??

1 क्युमेक (Cumec) – एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.

2) वाहते पाणी मोजण्याची एकके –
नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी ‘क्युसेक्स’ व ‘क्युमेक्स’ ही परिमाणं वापरतात. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’, तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. धरणाच्या दारातून किंवा एखाद्या बंधार्‍यावरून एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहतं आहे, हे यावरून कळतं. या वेगानं पाणी किती वेळ सोडलं जातं, त्यावर त्या धरणातून किती पाणी बाहेर पडलं हे ठरतं. फुटाशी संबंधित असलेलं ‘क्युसेक्स’ हे परिमाण सध्या प्रचलित आहे, पण मीटरशी संबंधित असलेल्या ‘क्युमेक्स’चा वापर आता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 05 धरणे

उजनी 117.27 टीएमसी
कोयना 105.27 टीएमसी
जायकवाडी 76.65 टीएमसी (पैठण)
पेंच तोतलाडोह 35.90 टीएमसी
पूर्णा येलदरी 28.56 टीएमसी
पाऊसही वेगवेगळ्या परिमाणांमध्ये मोजता येतो. अचूक नोंदीसाठी पाऊस मिलिमीटरमध्ये मोजला जातो. काही ठिकाणी सेंटिमीटर किंवा इंचामध्येही तो सांगितला जातो. या परिमाणांचा एकमेकांशी संबंध आहेच. ‘एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर’ आणि ‘एक सेंटिमीटर म्हणजे १० मिलिमीटर’. मागच्या पिढीत पाऊस इंचामध्ये सांगण्याची पद्धत होती. आता मुख्यतः मिलिमीटर हे परिमाण वापरलं जातं.

No comments:

Post a Comment