Tuesday, 9 May 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय नेहमी हवेत असतो,चे कारण काय?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय नेहमी हवेत असतो, याचे कारण काय?

घोड्याचे दोन्ही पाय हवेत असण्याला आहे एक ऐतिहासिक अर्थ. नक्की वाचा…

आपण अनेकदा थोर वीरांचे व महापुरुषांचे अश्वरूढ पुतळे पहिले असतीलच.
 आपण जरा बारकाईने पहिले तर आपल्या लक्षात येईल कि काही पुतळ्यांमध्ये घोड्याचे दोन्ही पाय हवेत आहेत तर काहींमध्ये फक्त एक पाय हवेत असतो.
 तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि याला एक ऐतिहासिक अर्थ आहे.

जेव्हा त्या महापुरुषाचे निधन युद्ध भूमीवर अथवा शत्रूशी लढताना होते.
 तेव्हा घोड्याचे दोन्ही पाय हवेत ठेवण्याची पद्धत आहे तर जेव्हा निधन हे इतर काही कारणाने होते तेव्हा केवळ एक पाय हवेत ठेवण्याची पद्धत आहे.

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामधे घोड्याचा एक पाय हवेत असतो.
 तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यामधे घोड्याचे दोन्ही पाय हवेत असतात.

No comments:

Post a Comment