"शालेय पोषण आहारामधील अनियमिततेबाबत कारवाई करू" -मा. संजय जावीर,शिक्षणाधिकारी (प्रा)सोलापूर
शिक्षक भारतीच्या सहविचार सभेमध्ये निर्णय
_बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी मा. संजय जावीर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोलापूर यांच्या कक्षामध्ये शिक्षक भारती संघटनेची सविचार सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले._
1. शालेय पोषण आहार : _ज्या खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांनी शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांची DBT ची रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही अशा शाळांची माहिती घेऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले._
2. अनधिकृत शाळा : _जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील व संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले._
3. फरक बिल : _मार्च 2023 अखेर प्राथमिक वेतन पथकाने किती शिक्षकांचे फरक बिले काढली ? किती शिक्षकाची बिले प्रलंबित आहेत ? फरक बिल काढताना कोणता निकष लावण्यात आला ? याबाबत संघटनेला माहिती देण्यात यावी असे मा. वेतन अधिक्षक, प्राथमिक यांना पत्र देण्यात येईल असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले._
4. अतिरिक्त शिक्षक समायोजन* : _शासननिर्णय 4 ऑक्टोबर 2017 नुसार मराठी माध्यमाच्या अल्पसंख्यांक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद मध्ये करण्यात आलेले आहे. अशा शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरती मार्गदर्शन मागण्यात येईल._
5. बिगर अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांचे समायोजन* : _ज्या खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे समायोजन गैरसोयीच्या ठिकाणी झालेले आहे अशा शिक्षकांना विशेषतः महिला शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे मान्य केले._
6. पद व्यपगत करणे : _समायोजनामध्ये ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करून घेतले नाही अशा शाळातील पदे व्यपगत करण्याबाबत उपसंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल._
7. सेवापुस्तक :_प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सेवापुस्तक अदययावत करण्यात यावीत, त्यांना दुय्यम प्रत देण्यात यावी, तसेच जुलै 2023 ची वेतनवाढ दिलेल्या पानाची साक्षांकित प्रत व सेवा पुस्तकाच्या शेवटच्या पानाची साक्षांकित प्रत माहे जुलै 2023 च्या वेतन देयकासोबत जोडण्याबाबतचे आदेश तात्काळ मुख्याध्यापकांना देण्यात यावेत, ही हे मागणी शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य केली. लवकरच याबाबतचे पत्र निघेल._
8.कायम लिपिकांची नेमणूक* : _खाजगी प्राथमिक विभागासाठी लवकरच कायमस्वरूपी लिपिकाची नेमणूक करण्यात येईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले._
9. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी* : _प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व पात्र असलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव तात्काळ संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र काढण्यात येईल._
10. सेवकसंच : _शैक्षणिक वर्ष 2022-23 चे सेवक संच येत्या दोन दिवसांमध्ये सर्व शाळांना देण्यात येतील._
11. RTE मान्यता : _सोलापूर जिल्ह्यातील वर्ष 2022-25 साठी RTE मान्यता देण्यात आलेल्या व कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या सर्व शाळांची यादी देण्यात येईल._
12. NPS खात्यातील रकमा मधील तफावत* : _एनपीएस धारक शिक्षकांचे एनपीएस मधून डीसीपीएस मध्ये रक्कम वर्ग करताना लाखो रुपयांचा फरक पडलेला आहे. याची संबंधिताकडे तपासणी करण्यात येऊन याबाबत योग्य तो आदेश दिला जाईल असे मा. शिक्षणाधिकारी यांनी सांगितले._
वरील सर्व मुद्द्यांवर संघटनेची बाजू ऐकून मा. शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे व येत्या दहा दिवसात या सर्व मुद्द्यांवर आढावा बैठक घेण्यात येईल असेही संघटनेला कळवले आहे.
सुजितकुमार काटमोरे (जिल्हाध्यक्ष)
शिक्षक भारती सोलापूर.
(८७९३१२०४८३)
No comments:
Post a Comment