आपल्या पैकी बहुतेकांच्या घराच्या बागेतील ब्रह्मकमळे आता फुलली असतील, हो ना!
आपण सगळे ज्याला ब्रह्मकामळ समजतो ते हे झाड.
हे झाड खरंतर एक निवडुंग वर्गीय वनस्पती आहे. (Epiphyllum oxypetalum).
याचे फुल सूर्यास्तानंतर उमलते आणि त्याला खूप छान सुगंध असतो.
रात्री कीटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून याचा रंग अगदी पांढरा शुभ्र असतो.
आता हे खरे ब्रह्मकमळ बघा.
(छायाचित्र: गुगल)
हे झाड फक्त उत्तर भारतात आढळते.
हे देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड या राज्याचे राज्यपुष्प आहे.
हे इतर कुठे उगवणे अशक्य च आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर मध्ये ही फुले शेकडोंच्या संख्येने उमलतात.
असं म्हणतात की, हे फुल बद्रीनाथ आणि केदारनाथ देवांचे अवडते फुल आहे.
उत्तर भारतातील लोक या फुलाला ब्रह्मकामळ म्हणतात.
अरेच्चा! इतकी वर्षे आपण ज्याला ब्रह्मकमळ म्हणत होतो ते तर एकप्रकारचे निवडुंग निघाले.
No comments:
Post a Comment