'पानशेत पॅटर्न'राज्यभरला शिक्षण क्षेत्रातून होतोय विरोध
शाळा मुलांच्या घरापासून दूर अंतरावर जाते तेव्हा शिक्षणही दूर जाते.
जितकी शाळा दूर जाईल तितका शंभर टक्के शिक्षणावर विपरीत परिणाम होतो या पॅटर्ननुसार एक ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार आहेत त्याला फक्त क्लस्टर हे गोंडस नाव दिले जात आहे.
यातच शाळांमध्ये मुलांना मैदानी कमी झाली आहेत त्यांनी जर कॉमन सुविधा दाखवल्या तरच मान्यता मिळत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शाळांची मैदानी जमिनी या खाजगीकरणात जाणार आहेत.
अशा शब्दात पानशेत पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून विरोध व्यक्त होत आहे शिक्षण क्षेत्रातील कार्य भाऊ चासकर म्हणाले मुलांच्या घरापासून शाळा दूर अंतरावर जाते तेव्हा शिक्षणही दूर जाते.
विशेषता मुलींचे शिक्षण थांबवण्याचे शक्यता वाढते वंचित बहुजन घटकांमधली मुले शिक्षण प्रवाहातून बाहेर जाण्याची भीती असते या विषयाकडे संवेदनशील नजरेने बघितले पाहिजे.
प्रत्येक शाळा म्हणजे एक स्वतंत्र परिसंस्था असते म्हणून याचा बायकेस स्टडी केस केला पाहिजे..
📕📕📕📕📕📕📕📕📕
हा तर खाजगीकरणाचा डाव----
आप पालक संघटनेचे मुकुंद किर्दत यांनी हा खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये याला क्लस्टर फार्मिंग म्हटले आहे.
ज्यात इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च वाचवणे हा उद्देश आहे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शाळा एक ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हवी ती नसेल तर मुलांसाठी वाहन व्यवस्थेची तरतूद करायला हवी खाजगीकरण ग्रामीण भागात सुरू पाहत आहे. सामाजिकरण ही जमेची बाजू असली तरी त्याबाबत शंका आहे दहा गावातील मुले एकत्र करणे त्यात सामाजीकरण कशाप्रकारे ही जमेची बाजू असली तरी त्याबाबत शंका आहे
💥💥💥💥💥💥💥💥💥
हेरंब कुलकर्णी----
🟣संकल्पना चांगली प्रवासाची मात्र समस्याच- ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या संकल्पनेचे स्वागत केले असले तरी प्रवासाचा मुद्दा पुढे केला आहे.
यावर वाद होऊ शकतात असे ते म्हणाले जिथे पाच ते सहा मुले असतात तिथे शिक्षणाचे वातावरण असते.
साधे मुलांचे स्नेहसंमेलन घेऊ शकत नाही शिक्षकांमध्ये पण शैथील्य येते. त्यामुळे नीट शिकवले जात नाही हा पॅटर्न चांगला आहे.
फक्त प्रवासाच्या दृष्टीने अडचणीचे वाटते सरकारने छोट्या वाहनांची व्यवस्था केली पाहिजे ती झाली नाही तर मुलांची शाळा गळती होऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
आपलं लोकमत
No comments:
Post a Comment