Sunday, 21 May 2023

बँकेत धनादेशाच्या मागील बाजूस सही का करावी लागते?

बँकेत धनादेशाच्या मागील बाजूस सही का करावी लागते?

पाहूया तरी, चेकच्या पाठीमागे तसे काहीही निर्देश दिले नसताना देखील बँकर आपल्याला रोख रक्कम देतेवेळी चेकच्या मागे सही करण्यास का सांगतो,ते…

जेव्हा एखादा खातेधारक रोखीने आपले पैसे काढण्यासाठी चेक किंवा विथड्रावल जमा करतो, तेव्हा कॅशिअर त्याला पैसे देतो.
तो घरी जातो…

खरं तर इथे व्यवहार पूर्ण झाला.

पण जर थोड्या वेळाने तीच व्यक्ती अथवा दुसरा कोणीतरी येऊन कॅशियरला सांगतो की माझे टोकन हरवले आहे,
पण त्याच चेकचे पैसे मला द्या.

आता कॅशियरकडे पैसे दिल्याचा काहीच पुरावा नाही.

अशा वेळी चेकच्या मागे कॅशिअरने घेतलेली सही कामी येते!

ही केवळ नियमांनुसार घेतली केलेली सुरक्षा व्यवस्था आहे.
माझ्या चाळीस वर्षांच्या नोकरीत मी पुन्हा कधीही कोणाला अशा रीतीने पैसे मागताना पाहिले नाही.

अर्थात इथे अशीही एक शक्यता आहे की टोकन घेतल्यानंतर, जर त्याने ते खरोखरच हरवले आणि जर एखादा अयोग्य मनुष्य पैसे घेण्यासाठी आला तर तो योग्य प्रकारे सही करू शकणार नाही आणि पकडला जाईल.
अजून एक गोष्ट आहे.

जेव्हा बेअरर चेक बँकेला सादर करून त्याचे रोख पैसे घेणार्‍याने,नंतर पैसे घेतल्याचे मान्य केले नाही, तर चेकच्या पाठीमागची त्याची सही त्याच्या विरोधात जाऊ शकते.
लक्षात असू द्या की कॅशियर मोठ्या रकमेचे पेमेंट तिसऱ्या व्यक्तीला करण्यापूर्वी त्याच्या ओळखपत्रावरची सही चेकमागे त्याने केलेल्या सहीबरोबर जुळवतो,
 त्याचा ओळखपत्र क्रमांक नोंदवतो आणि मगच त्याला पैसे देतो!

एक गोष्ट नेहमीच लक्षात असुद्या,
बँकर्स या सर्व गोष्टी आपल्या पैशांच्या सुरक्षिततेसाठीच करतात! त्यांना नेहमीच सहकार्य करा!

No comments:

Post a Comment