तोफ तोफेचे गोळे हे दगडी किंवा धातूचे असायचे. मग, तोफेच्या भडिमाराने किल्ल्यांवर आग कशी लागत असे?
गोळ्याभोवती ज्वालाग्राही आवरण वगैरे असायचे का?
दगडाचे घोळे फेकणारी भडिमारयंत्रे वेगळे असत. तोफेत दगडी गोळे वापरल्याचे ऐकिवात नाही.
प्रथम तोफेत भरीव गोळे वापरत.
नंतर नंतर कुलपी गोळे आले.
हे आतून पोकळ असत.
त्यात दारू भरलेली असे. अजूनही असते.
गोळा लक्ष्यावर आपटला की तो फुटून दारू पेटे; व आग लागे. गोळ्याच्या कवचाचे तुकडे उडून माणसे मरत.
भरीव गोळ्यांविषयी; गोळा उडताना पाठीमागे दारूचा प्रचंड भडका असे.
त्यामुळे गोळा तापणार.
प्रचंड वेगाने हवेतून प्रवास करताना हवेशी होणार्या घर्षणामुळे तो अधिकच तापतो. जिथे आपटेल तिथेही प्रचंड गती शून्यावर येताना, गतीजन्य ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होऊन खूप उष्णता निर्माण होते.
ह्या सर्वांमुळे गोळ्याभोवती ज्वालाग्राही आवरण आपोआप तयार होते.
गोळा पडल्यावर जवळ शुष्क गवत वा कपडे किंवा तत्सम गोष्टी असल्या तर आग लागणे सहज शक्य आहे.
No comments:
Post a Comment