हेलिकॉप्टर ने कैलास पर्वताच्या मार्गात असणाऱ्या मानसरोवर पर्यंत जाता येतं पण अद्भुत आणि गूढ अशा कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत जाता येत नाही
कैलास पर्वताची एक स्वयंभू पर्वत म्हणून ओळख असून याचं दुसरं नाव 'ओम पर्वत' असंही आहे.
विविध रुपांनी आणि नावांनी भाविकांमध्ये श्रद्धास्थान मिळालेला हा पर्वत 'अजय्य पर्वत' नावानेही ओळखला जातो. या पर्वताच्या शिखरापर्यंत कोणीही पोहोचू शकलेलं नसल्यामुळेच तो 'अजय्य' नावानेही प्रचलित आहे.
आकाश आणि पृथ्वी ला जोडणारा तसेच दहा दिशा एकत्र येणारे ठिकाण म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो.
तसेच आणखी एक कारण म्हणजे जगातील सर्वाधिक शुद्ध तलाव असणाऱ्या मानसरोवर ची यात्रा.
हिंदू धर्मात या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे.
शीख धर्माचे गुरू गुरुनानक यांनीही याच ठिकाणी ध्यानसाधना केली होती असे म्हटले जाते.
(छायाचित्र स्रोत :- गुगल बाबा)
काश्मीर पासून ते भूतान पर्यंत कैलास पर्वत पसरलेला आहे. हवाई मार्गाचा वापर केला तर काठमांडू पर्यंत विमानाने जाऊन त्यापुढे रस्तामार्गे जाता येते.
कैलास यात्रेसाठी हेलिकॉप्टर चा वापर करता येतो त्यासाठी काठमांडू - नेपालगंज - सिमीकोट असा प्रवास करावा लागतो. पण हा प्रवास मानसरोवरपर्यंतच करता येतो.
मानसरोवरपर्यंत रस्तामार्गे जाण्यासाठी दणकट वाहने असावी लागतात जसे की लँडक्रूझर, लँडरोव्हर, थार इ.
हेलिकॉप्टर ने फक्त मानसरोवर पर्यंत जाता येते.
आजपर्यंत पर्वताच्या शिखरापर्यंत कोणीही जाऊ शकले नाही. हेलिकॉप्टर नेही नाही.
हेलिकॉप्टर वर शिखराच्या दिशेने गेल्यानंतर हेलिकॉप्टर चे नियंत्रण बिघडणे, हेलिकॉप्टर भरकटणे असे अनुभव आले आहेत.
No comments:
Post a Comment