Sunday, 7 May 2023

रेल्वेच्या डब्यावरती गोल गोल झाकणे का बसविण्यात येतात?

रेल्वेच्या डब्यावरती गोल गोल झाकणे का बसविण्यात येतात?


भारतीय रेल्वे (Indian Raiway) जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे.
 भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
 तुम्ही लहानपणापासून ट्रेननं प्रवास करत असाल, बऱ्याचवेळा तुमचं लक्ष हे ट्रेनच्या छतावर असलेल्या झाकणांवर गेलं असेल.

ट्रेनवर असलेल्या या झाकणांचा प्रवाशांसाठी खूप उपयोग होतो. 
जर हे झाकण ट्रेनमध्ये नसेल तर प्रवाशांना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 
ट्रेनच्या डब्यांवर असलेल्या या झाकणांना रूफ व्हेंटिलेशन म्हणतात. त्यामुळे च्या डब्यातील सफोगेशन होत नाही. बहुतांश गाड्यांच्या जनरल डब्यात असे घडते. 
गर्दीमुळे अनेकांना गुदमरल्यासारखे वाटते. 
त्यामुळे त्या डब्याच्या छतावर व्हेंटिलेशनसाठी ही सिस्टम बसवण्यात येते.

काही गाड्यांच्या डब्यांच्या छतावर असलेल्या या जाळीचे छिद्र खूपच लहान असतात. 
तर अशा वेळी सगळी आद्रता ही या जाळीतून बाहेर पडते. दरम्यान, तुम्ही विचार करत असाल की ट्रेनला असलेल्या खिडक्यांमधून ही वाफ बाहेर पडू शकते. 
तर आद्रता आणि गरम हवा ही नेहमीच वरच्या दिशेला जाते कारण विज्ञानानुसार थंड्या हवे पेक्षा गरम हवा ही प्रसरण पावल्याने हलकी असते.
जेव्हा प्रवाशांची गर्दी वाढू लागते, तेव्हा ट्रेनमध्ये गरम हवा अधिक वाढते. 
यावेळी, ट्रेनच्या डब्यावर असलेल्या या व्हेंटिलेशन रुफमधून गरम हवा बाहेर पडते. 
ज्यामुळे ट्रेनमधील तापमान नियंत्रित होते.

No comments:

Post a Comment