Saturday, 6 May 2023

मुले पालेभाज्या खात नसेल तर हे उपाय करा....

मुले पालेभाज्या खात नसेल तर हे उपाय करा....


 खाण्याच्या बाबतीत खूपच नखरे असतात अशी तक्रार आपल्याला प्रत्येक पालकांकडून सतत ऐकायला मिळते.
 त्यातही पालेभाज्या व फळे खायचे म्हटले की मुलं अजूनच नाक मुरडतात मुलांना कितीही समजावून सांगितले तरी पालेभाज्या व फळ त्यांना खाऊ घालणं हे पालकांच्या दृष्टीने फारच महाकठीण काम असतं.
 त्यांच्यासमोर कितीही सुंदर पद्धतीने पालेभाज्या बनवून ठेवली तरीही 
मुले त्याच्याकडे बघत देखील नाहीत अशा परिस्थितीत मुलांना सकस पौष्टिक आहार व पालेभाज्या खायला घालणे पालकांसाठी एक मोठा टास्कचा असतो.
 काहीही सोपे पर्याय वापरून आपण आपल्या मुलांना पालेभाज्या खाण्याची कोडी लावू शकता त्यासाठी असे करा. उपाय--
💥 तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर खा--
पालकांनी मुलांसाठी आदर्श बनले पाहिजे तुमच्या मुलांसमोर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी करण्यास सुरुवात करा मुलांसमोर तुम्ही देखील पालेभाज्या खायला सुरुवात करा यामुळे मुलं तुम्हाला पाहून आरोग्यदायी गोष्टी लवकर आणि सहज खायला शकेल तुम्ही सर्वजण मिळून सकस आणि पौष्टिक अन्न खाण्यास सुरुवात करा याचा मुलाच्या खाण्याच्या सवयीवर मोठा परिणाम होईल मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करत असतात.
💥 मुलांना बाहेरच्या गोष्टी आणि फास्ट फूड खायला फार आवडतं त्यामुळे तुम्ही त्याच्या आवडत्या डिशमध्ये पालेभाज्या घालून त्याला खायला देऊ शकता जसे की काही मुलांना नूडल्स आवडतात तर तुम्ही नूडल्स बनवताना त्यात हिरव्या पालेभाज्या घातल्या तर नूडल्स सोबत हिरव्या पालेभाज्या सुद्धा खातील.
💥 जेवताना नाही म्हणायची सवय मोडा---
जेवणाबाबत आणि एकंदर खाण्याबाबत तुम्ही लहान मुलांना काही गोष्टींची सवय लागली पाहिजे त्यांना शिकवा की जे काही जेवण बनवलं आहे ते खायलाच हवं जर मुलं हिरव्या पालेभाज्या बघून जेवण जेवायचे टाळत असतील तर तुमची जबाबदारी आहे की त्या पालेभाज्यातून अशा डिशेस बनवाव्यात की त्याला मुलं नकार देणार नाहीत त्या इतक्या स्वादिष्ट बनवा की त्याने त्या पूर्ण खायलाच हव्यात मुलांचे आवड निवडीवर ओळखून आवर्जून त्यांना आवडेल असे जेवण बनवा.
💥 मुलांना कलरफुल भाज्यांच्या डिशेस बनवून द्या 
लहान मुलांना वेगवेगळे गडद रंग आवडतात त्याचप्रमाणे त्यांच्या आवडीचे रंग ओळखून पालकांनी भाज्या अधिक आकर्षक पद्धतीने कापल्या पाहिजेत.
आपण या भाज्या नेहमी कापतो तश्या न कापता मुलांना आवडतील अशा वेगवेगळ्या आकारात कापड जसे की आपण चांदणीच्या आकारात किंवा प्राण्यांच्या आकारात भाज्या कापून घेऊ शकता त्यामुळे मुलांना भाजीपाला खायला आणि खेळायला मदत होईल.
त्या वेगवेगळ्या आकारातील भाज्या पाहून मुलांना ते खाण्याचा मोह होईल या निमित्ताने मुलांकडून पटापट भाज्या खाल्ल्या जातील.

No comments:

Post a Comment