Thursday, 11 May 2023

असे काही महान मराठा योद्धे कोण ज्यांचे कार्य महान होते पण इतिहासात त्यांचे नाव झाले नाही?

असे काही महान मराठा योद्धे कोण ज्यांचे कार्य महान होते पण इतिहासात त्यांचे नाव झाले नाही?

शिवाजी महाराजांचे बरोबर संभाजी महाराज ,राजाराम महाराज ,सर्व पेशवे ,बाजीप्रभू ,तान्हाजी, येसाजी ,नेताजी मुरारबाजी कान्होजी ,प्रतापराव, हंबीरराव आणि इतर यांचे आपण कौतुक ऐकतो पण खालील लोकांनी पण तेवढीच तोलामोलाची कामगिरी केली

🟣०१.खंडो बल्लाळ---
स्वतःच्या वडिलांना आणि भावाला शंभू महाराजांनी हत्ती खाली देऊन मारले तरी सुद्धा खंडो बल्लाळ ने स्वतःला स्वराज्य साठी वाहून घेतले.होता खंडो म्हणून वाचला शंभो हि म्हण ज्याच्यामुळे समाजात रूढ झाली त्या स्वामी भक्त खंडो बल्लाळ चिटणीस मनापासून मुजरा

त्यांनी शंभू महाराजांना गोव्या मध्ये म्हापसा जवळ खाडी ओलांडताना बुडताना वाचवले.
संगमेश्वरी युद्ध वेळी जेंव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले तेंव्हा येसूबाईंना रायरी ला सुखरूप परत आणून दिले.
राजाराम महाराज जिंजी मध्ये अडकलेले असताना गणोजी शिर्के ला आपले वतन दिले आणि गणोजी शिर्के ला मदत करायला भाग पडले आणि राजाराम महाराज जिंजी तुन सुखरूप निघाले.स्वतःचे वतन वर तुळशीपत्र ठेवले.
स्वतः ची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब झाली

🟣02.संताजी जाधव(धनाजी जाधव पुत्र)--
धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या नंतर शत्रुत्व झाले पण आधी जिवलग मैत्री होतो . त्यामुळे आपल्या पहिल्या मुलाचे नाव धनाजी जाधव ने संताजी ठेवले होते. ते पण आपल्या प्रिय मित्रावरून. धनाजी संताजीच्या युद्ध नितेने इतका भारावला होता .

संताजी घोरपडे ने सुद्धा त्याला जवळ केले आणि पुत्रवत प्रेम केले. संताजी जाधव पिता धनाजी जाधावाप्रमाणे शूर आणि पराक्रमी होता. चंदान्वंदन च्या लढाईत वाघाप्रमाणे लढला मोघलांनी घेरले तरी हत्यार खाली ठेवले नाही अंगावर असंख्य जखमा झाल्या मराठ्यांनी याला कसा- बसा रणांगणातून परत आणले पण अंगावर असंख्य जखमांमुळे याचा मध्यरात्री मृत्यू झाला. साऱ्या रात्रभर संताजी घोरापाद्यानी त्याला आपल्या मांडीवर घेवून काढली.

सेनापती या पदासाठी या दोघांच्यात जेव्हा वाद झाले तेव्हा संताजी एकदा धनाजीला म्हणाला " धनसिंग अरे हे दिवस बघायला तुझा पोर संताजी इथे नाही आहे पण जर तो असता तर तलवार घेवून पहिली तुझी गर्दन छाटली असती

🟣03रामजी पांगेरा-----
कण्हेर गडा वर अवघ्या ७०० सैनिकांनी दिलेर खान सारख्या ;कसलेल्या योद्ध्याला आणि ३०००० मुघलांना पळवून लावले. असे म्हणतात कि अफझलखानच्या युद्धात त्याने पण पराक्रम गाजवला होता. पण इतिहासात तो कोण कुठला गावच माहीत नाही त्याविषयी माहिती नाही

🟣०4. अंताजी माणकेश्वर----
पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर तब्बल २१ वर्षे दिल्ली ताब्यात ठेवून मराठी राज्यासाठी अनेक लढाया लढलेले अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या कामगिरीची इतिहासात नोंद आहे

उत्तर हिंदुस्थानांतील पेशव्यांचा एक सरदार ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. आडनांव गंधे. अंताजी पेशव्यांच्या तर्फे दिल्लींत फौज घेऊन होता, त्याचें व वकील हिंगणे यांचें पटत नव्हतें.उत्तर हिंदुस्थानची कनौजी भाषा, फारसीवर प्रभुत्व, तलवारबाजीत िनपुणता आणि शत्रूशी बोलण्यातून मात करण्याचे कसब या गुणांमुळे छत्रपतींनी पेशव्यांना हुकूम देऊन अंताजीची नेमणूक मराठ्यांचे दिल्लीतील मुत्सद्दी म्हणून केली. त्यासाठी त्यास सात हजार स्वारांची मनसब दिली. उत्तरेकडील राजकारणात शिंदे - होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून अंताजीस मोठे महत्त्व प्राप्त झाले.

🟣०5.रंगो नारायण----
आपल्याला पावनखिंडीच्या बाजीप्रभूच्या इतिहास माहिती आहे पण त्यावेळी विशाळगड च्या किल्लेदार त्यावेळी रंगो नारायण होते.त्यांनी सिद्दी मसूद , सुर्वे जसवंतराव च्या फौजेला पराभव केला आणि महाराज विशाल गड वरबसुखरूप पोचले.विशाळगड सर्व किल्ल्यामध्ये बुलंद किल्ला , अर्ध्या बाजूला अक्खा कोकण उरलेल्या अर्ध्या बाजूला घाट..म्हणजे वेढा पडला तर तुम्हाला फक्त अर्धा च किल्ला लढवायचा आहे .आशा किल्ला फक्त प्रामाणिक माणसाकडे दयायला शिवाजी महाराजांचा मानस.

🟣5)रंगो नारायण------
:पोतदार हे विशाळगड चे किल्लेदार होते. त्यांना अफझलखान ने खूप आमिषे दाखवली पण ते बांधले नाही . उलट त्यांनी महाराजांना मदत केली. राज्यभिषेकाच्या वेळी महाराजांनी त्यांना पालखीचा बहुमान दिला. ते सैदव स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. शंभू महाराज आणि राजराम महारांच्या काळात सुद्धा ते आणि त्यांची मुले एकनिष्ठ राहिले.. शंभू महाराजनांनी त्यांचे १६८३-८४ च्या वेळी खूप कौतुक केले होतहोते . एकटा विशाळगड असा होता जो मुघली आक्रमणाला जास्त बळी पडला नाही कारण जिंकायला अतिशय अव्वगड. राजाराम महाराज सुद्धा रायगड वरून निसटून विशाळगड ला गेले होते.त्याम्च्या नंतर त्यांचा कुटुंबांनी आणि वारसांनी सुद्धा स्वराज्याशी प्रामाणिक राहिले.रामचंद्र पंत बावडेकर पण इथेच वास्तव्यास होते.आणि शम्भू महाराज नंतर राजाराम महाराज येऊ पर्यंत ते "हुकूमतपन्हा" म्हणून किल्ल्यावरुन कारभार हाकला. सन 1692 त्यांच्या मुलगा काशी रंगनाथ आणि पंत प्रतिनिधींनी मिळून पन्हाळा जिंकला.

🟣06.(इतिहासाला नाव माहित नाही) "अनोळखी" : संभाजी महाराज च्या बलिदानानंतर औरंगझेब आणि त्यांच्या साथीदारांनी स्वराज्याचे किल्ले घ्यायचे सपाट लावला . पण पन्हाळा ला औरंगझेब कैक महिने वेढा मारून बसला पण किल्ला हाताला आला नाही. शेवटी रामचंद्र अमात्य च्या सांगण्यावरून त्या किल्लेदाराने किल्ला हवाली मॆळा. त्या किल्लेदाराचे नाव इतिहासाला माहित नाही. पण शक्यतो कागल चे घाटगे असावेत .

पन्हाळा लढवणार अनोळखी सरदार

🟣07.सूर्यराव काकडे-------
 साल्हेर च्या युद्धात हजारो मुघल आणि मराठे गेले . पण शिवाजी महाराजांना विशेष दुःख झाले ते सूर्यराउ काकडे गेल्याचे . ते त्यांचे बालमित्र असल्याचे ...एका बखरी मध्ये साल्हेरीचा विजयाचा असा उल्लेख आहे "जंबूरियाचा गोळा लागून पडला.सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे.भारती जैसा कर्ण योद्धा,त्याच प्रतिमेचा असा शूर पडला.वरकडही नामांकित शूर पडले.असे सुद्ध होऊन फत्ते जाहली."

🟣08.रुपाजी भोसले--------
रुपाजी भोसले याने रामसेज, कल्याण, भिवंडी, रायगड, कोल्हापूर आणि पन्हाळा येथे मुगलांना पराभूत केले.संभाजी महाराजांच्या काळात थोर पराक्रम केला

🟣09.मानाजी मोरे----
मानाजी मोरे आणि संताजी जगताप हे रुपाजी मदत करीत होते.

🟣10.आनंदराव मकाजी------
नेसरी च्या युद्धात " वेडा त वीर दौडले सात " , पण मागे होते आनंदजी आणि हंसाजी मोहिते . हंसाजी मोहिते नंतर हंबिराव झाले पण आनंदराव चा उल्लेख सापडला.

या शिवाय रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, परशुराम त्रंबक यांनी 27 वर्षाच्या औरंगझेब च्या युद्धात खूप मोलाची कामगिरी बजावली पण त्यांना तास न्याय मिळाला नाही.मनाकोजी दहातोंडे , तुकोजी चोर, सर्जेराव जेधे(कान्होजी जेधे पुत्र), कागलचे घाडगे यावर इतिहासात कमी लिहले आहे.

No comments:

Post a Comment