सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार आहेत. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सर्व पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये सुमारे 30 ते 35 लाखांच्या घरात पाठ्यपुस्तके पोहोचले आहेत.
समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून हे नियोजन करण्यात आले आहे.
🟣पंधरा दिवस अगोदर मिळणार पाठ्यपुस्तके-----
मागील दोन वर्षात कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर बंद राहिल्या त्यामुळे समग्र शिक्षा अभियाना आणि महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत पुरवठा करण्यात आलेली पाठ्यपुस्तके वेळेत पोहोचू शकली नव्हती मात्र यंदा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने नीट नियोजन केल्याने 15 दिवस अगोदर शाळांमध्ये सर्व पाठ्यपुस्तके पोहोचणार असल्याची माहिती दिली आहे...
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
पाठ्यपुस्तकांची केली आगाऊ नोंदणी----
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्याचा आनंद वेगळाच असतो याच विचाराने यंदा विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचा प्रयत्न आहे.
त्यासाठी बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदवण्यात आली असून पुस्तक वितरणाची नियोजन ही केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत..
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके------
1) राज्यातील सरकारी अनुदानित सोशल वेल्फ वेअर आदिवासी महापालिका आदींच्या जवळपास सर्व शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके शैक्षणिक वर्षात मोफत मिळणार आहेत.
2) पहिली ते आठवीपर्यंत शाळांना तब्बल पाच कोटी 38 लाख 398 पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार असून त्याचे काम 91 टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे.
3) येत्या काळात राज्यातही पुस्तकांचा पुरवठा पूर्ण होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
प्रवेशोत्सव ही साजरा करणार-----
💥 समग्र शिक्षा अभियाना व्यतिरिक्त पहिली ते बारावीचे सर्व पाठ्यपुस्तके खोल्या बाजारात विक्री करता उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
💥 नियोजनानुसार पुस्तक वितरण पार पडल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत.
💥 त्याबरोबर शाळेचे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करून " प्रवेश उत्सव" साजरा करण्याचे नियोजन असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली..
No comments:
Post a Comment