काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय?
अंदमान निकोबरची राजधानी पोर्टब्लेअर आहे.
तेथे कोठडी बंद कारागृह ( सेल्यूलर जेल) आहे.
भारतीय मुख्य भुमी पासुन हे जेल हजारो की.मी. दूर आहे.
तसेच जिथे हे तुरुंग आहे ते पोर्टब्लेअर चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले होते.
ते क्षेत्र बंगालच्या खाडी अंतर्गत येते.
म्हणून त्याला काळं पाणी म्हटलं जायचं.
ज्या भारतीय कैदयांना शिक्षा झाल्यानंतर या तुरुंगात ठेवण्यात येई,त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत.
सेल्युलर तुरुंगात तीन मजल्यांच्या ७ ब्रान्चेस बनविण्यात आल्या होत्या.
यात एकूण ६९६ सेल होत्या,प्रत्येक सेलचा आकार ४.५*२.७ मीटर होता.
येथे प्रत्येक सेल मध्ये ३ मीटर वर खिडक्या देखील बनविण्यात आल्या होत्या,
जेणेकरून कुठलाही कैदी येथून बाहेर निघू शकेल
पण तो पळू शकत नव्हता कारण चारही बाजूंनी येथे पाणी होते.
माहिती स्रोत : गुगल
No comments:
Post a Comment