Saturday, 6 May 2023

आधार ने शाळा बेजार आणि पालक थंडगार....! अनेक शिक्षक होणार अतिरिक्त

आधार ने शाळा बेजार आणि पालक थंडगार....! अनेक शिक्षक होणार अतिरिक्त


शाळा स्तरावर मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटिंगचे काम सुरू आहे यासाठी 30 एप्रिल ची दिलेली डेडलाईन संपली.
तरीही अजून तब्बल लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे आधार अपडेटेशन झालेले नाही.
 यापुढे विद्यार्थ्यांचे आधार नाही तर कोणत्याही योजनेचे ना शाळांना अनुदान ना शिक्षकांना पगार ही भूमिका शासनाने घेतली असल्यामुळे आधार कार्ड अपडेशन साठी शाळा रात्रंदिवस झटत आहेत.
यासंदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे शिक्षकाचा मेटाकुटीला आले आहेत.
 यापुढे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर संच मान्यता होणारा आहे मात्र अजूनही जिल्ह्यातील अनेक शाळांचे आधार अपडेशन रखडलेले आहे.
परिणामी संच मान्यता ही खोळंबली आहे
 संच मान्यतेत जेवढे आधार कार्ड तेवढीच पटसंख्या गणली जाणार आहे.
 त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
 संच मान्यतेसाठी शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टल वरतीच एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि प्रमाणीकरण बंधनकारक केले होते.
मात्र पोर्टल सतत हँग होत असल्यामुळे शाळांना आधार अपडेट करण्यास अडचण येत होत्या.
 अनेकदा काही विद्यार्थ्यांचे आधारवरील माहिती जुळत नाही यासंदर्भात शाळांनी पालकांची संपर्क साधला पण बालकांकडून प्रतिसाद मिळत नाही शिक्षण विभागाकडून आधार डेटा संबंधी वारंवार आढावा घेतला जात आहे त्यामुळे आता अनेक मुख्याध्यापक व शिक्षक पार वैतागले आहेत..

लोकमत
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣-----

आधार अपडेशनची मुदत संपलेली असली तरी आठ-दहा दिवसांची आणखी मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा आहे.
आता स्टुडंट्स पोर्टल सुरळीत झाले आहे काही मुख्याध्यापकांनाही आधार अपडेशन कडे दुर्लक्ष केल्याची जाणवत आहे.
 त्यामुळे 72 हजार विद्यार्थ्यांचे आधार अपडेशन प्रक्रिया झालेली नाही तर 92 हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणे करण झालेले नाही हात जोडून विनंती करतो.
की आधारामुळेच आपला टिकाऊ लागणार आहे यामुळे प्रक्रिया गतिमान करा..
एम.के.देशमुख 
शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर

No comments:

Post a Comment