नवीन मोबाइलच्या मागे चार - पाच कॅमेरे असतात, ते एकत्रित काम करतात की वेगवेगळे? एवढे कॅमेरे लावण्याचे कारण काय?
आज आपण अनेकदा असे ऐकतो की, विवो Y-15 स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा आहे,रेडमी नोट ८ ला क्वाड कॅमेरा आहे.अशी वाक्ये नेहमीच कानावर पडतात,तसेच आपण स्मार्टफोन्सच्या चित्रकाची (कॅमेरा) वैशिष्ट्ये तपासून बघत असताना आपल्या डोळ्यांसमोर 48+8+2+2 MP, 13+8+2 MP असे नक्कीच दिसून येते.
याचा नक्की अर्थ काय ?? त्याचा नक्की वापर काय ??
चला तर मग आज आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पूर्वी साधा फोन किंवा प्रारंभिक स्मार्टफोन्सला केवळ एक कॅमेरा असायचा,कालानुरूप तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ड्युअल, ट्रिपल,क्वाड अशा प्रकारांचे स्मार्टफोन्स बाजारपेठेत येऊ लागले आहेत.
सिंगल - एक कॅमेरा असणारा फोन, ड्युअल - दोन कॅमेरा
ट्रिपल - तीन, क्वाड - चार कॅमेरे.
बहुविध (मल्टिपल) कॅमेरे असण्याची कारणे किंवा त्याचे फायदे खालीलप्रमाणे :-
ग्राहकवर्गाची नवनवीन व अधिक प्रगत मागणी.
विविध प्रकारांमध्ये छायाचित्र काढण्यासाठी यांचा अधिक वापर केला जातो.उदाहरणार्थ - काही फोटो अल्ट्रावाईड मोड,वाईड मोड,डेप्थ मोड,तर काही झूम मोड काढले जातात.काही कॅमे-यांमुळे फोटोची झूमिंग क्षमता वाढते,ज्यामुळे फोटो काढताना किंवा काढल्यावर तो झूम केल्यानंतर देखील त्याची गुणवत्ता उच्च दर्जाचीच राहते.
अशा कॅमे-यांमुळे अल्प प्रकाश किंवा नाईट मोडमध्ये फोटो काढणे सुलभ बनते.
कॅमेरांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संवेदक (AI Sensors) प्रकाश संयोजन व छायाचित्रांची सुस्पष्टता व उजळपणा यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.संवेदक जितके अधिक कार्यक्षम,तितकी अधिक छायाचित्रांची स्पष्टता (Clearity).
विविध कोनांमधून (Multiple Angle Direction) प्रभावीपणे छायाचित्र खेचण्यासाठी अशा बहुविध कॅमे-यांचा उपयोग होतो;जे आपण सिंगल किंवा ड्युअल मध्ये करू शकत नाही,कारण त्या कॅमे-यांना दर्जाची मर्यादा असते.एक उदाहरण देतो,तुम्हाला केवळ एकच गुणवान मित्र आहे,जो तुम्हाला मर्यादितपणे उपयोगी आहे;कारण त्याच्याकडील गुण मर्यादित आहेत.पण जर तुमच्याकडे विविध गुणधर्म असणारे मित्र-मैत्रिणी आहेत आणि ते तुम्हांला विविध परिस्थितींमध्ये उपयोगी पडतात,तर तुम्ही एकाचीच संगत धराल का अनेकांची ??
बहुविध कॅमे-यांचा अजून एक फायदा म्हणजे कॅमे-यांची फोकल लेंथ सहजपणे बदलता येते.त्यावर छायाचित्राची सुस्पष्टता अवलंबून असते.
बहुविध कॅमेरे हे कसे काम करतात ??
हे कॅमेरे छायाचित्रकारांच्या गरजेनुसार स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे कार्य करून आपली भूमिका बजावतात.छायाचित्रकाराला नक्की कशा प्रकारे छायाचित्र खेचायचे आहे,त्यावर कॅमे-याची विविधांगी भूमिका अवलंबून असते.
विविध कॅमे-यांमधील समन्वय व एकत्रित कार्य हे अधिक प्रभावी व सुस्पष्ट छायाचित्र देते.म्हणतात ना, 'एकी हेच बळ'.
13+8+2 MP आणि 48+8+2+2 MP यांचा अर्थ काय होतो?
ही वैशिष्ट्ये रिअर कॅमे-यांची (पाठीमागील) संख्या आणि त्यांची पिक्सेल क्षमता तसेच दर्जा दर्शवितात.
13+8+2 MP म्हणजे संबंधित स्मार्टफोनचा कॅमेरा हा ट्रिपल आहे.
याचा अर्थ,
13 मेगापिक्सेल - मुख्य कॅमेरा.
8 MP - सुपर वाईड अँगल कॅमेरा
2 MP - डेप्थ मोडसाठी वापर.
48+8+2+2 MP म्हणजे यातून क्वाड किंवा चार कॅमेरे असणारा फोन आहे,हे सूचित होते.
याचा अर्थ,
48 MP - मुख्य कॅमेरा.
8 MP - अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा.
2 MP - डेप्थ मोडसाठी वापर.
2 MP - मॅक्रो लेन्स साठी वापर.
प्रत्येक स्मार्टफोन्स आणि त्याच्या कॅमे-यांचा दर्जा,वैशिष्ट्ये,प्रकार हे सारे भिन्न असतात.
No comments:
Post a Comment