Wednesday, 3 May 2023

प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वी अफजल खानाने त्याच्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला होता ही गोष्ट खरी आहे का?

प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वी अफजल खानाने त्याच्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला होता ही गोष्ट खरी आहे का?
हिंदू न्यूज पेपर आणि टाइम्स of India सारख्या पेपर ने या विषयी लिहाले आहे.

ब्रिटिश musium मध्ये पण या विषयी माहिती आणि जुन्या काळातील फोटो आहे.

शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे . अनेक ठिकाणी पुरावे नाहीत .महाराजांच्या कारकिर्दितील मधील 6 ते 8 वर्ष मधील पत्रव्यवहार मिळत नाही. या उमेदीच्य काळात महाराज स्वस्थ बसणे केवळ अशक्य.
वरील प्रश्नाचे मी एकदा उत्तर दिलेले. छत्रपती शिवाजी महाराज हे अफझलखानच्या बायकांच्या मृत्यूशी कसे निगडित होते? स्पष्ट कराल का? चे आशीष माळीने दिलेले उत्तर
ज्या अफझल खानाने शिवाजी महाराज्यांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना फसवून मारले ,त्याच अफझल खानाला स्वतःच्या 64 बायकांना स्वतःच्या हातानी माराव्या लागला ते पण अफझल खान चा गुरू आणि त्याला वाटत असणंरी शिवाजी महाराजची भीती कारणीभूत ठरले. आणि हे घडले प्रतापगडच्या युद्धा आधी आधी विजपुरात.

विजापूर -मध्ये-अथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी 7 कि.मी.वर एका निर्जन जागी एक विहीर असून तिला आज ‘खून बावडी’ म्हणतात.
३ मजल्यांची रचना असणारी खुनी बावडी सुबक पणे उभी आहे. काहींच्या म्हणण्यानुसार या विहिरीत अफझलखानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे 64 कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग ‘साठ कबर’ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्त्व विभागाची स्थापना केली होती. त्या खात्याअंतर्गत इ.स. 1880 साली या खात्याचे प्रमुख हेन्री पुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरींची माहिती फोटोसह संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो उपलब्ध आ
हे ठिकाण मराठा इतिहासाशी अप्रत्यक्षपणे नाते सांगते कारण हे ठिकाण "बुतशिकन, कुफ्रशिकन खान ए खानान - सिपेह सालार- अफजल खान "ह्या विजापूरच्या विख्यात सेनापतीशी संबंधित एक दुःखद आठवण बाळगून तिचा इतिहास सांगत आजही उभे आहे. .
विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वांत बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती त्याचे नाव अफजलखान! खानाचे मूळ नाव अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती. अफझलखान किती पराकोटीचा अहंकारी होता याचा प्रत्यय त्याच्या शिक्क्यातून येतो. त्याने शिक्क्यावर लिहिले होते

गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफझल

अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफझल अफझल

अर्थ : उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.*

अफजल खानासोबत शिवाजी महाराजांचे राजकीय वैरासोबतच वयक्तिक वैर सुद्धा होत. अफजल खानाविषयी आऊसाहेब जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर संताप होता कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांच्या मृत्यूलाही अफजल खान जवाबदार होता. त्याने छळ-कपट करून शिवाजी महाराजांच्या जेष्ठ बंधूंना ठार केले हिते. दुसरे कारण म्हणजे अफजल खानाने शहाजी महाराजांना देखील बेड्या ठोकल्या होत्या, केवळ मुत्सद्दी पणामुळेच शाहजी राजे बचावले होते. अफजल खान अत्यंत क्रूर निर्दयी आणि स्वार्थी होता. . अफजल खान एक शायर आणि कवी सुध्दा होता. त्याला संस्कृत भाषेचही ज्ञान होत तो एक नंबरचा नास्तिक होता. त्याने पर्शियन भाषेत एक शेर लिहिला होता. त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो, **जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो देव सुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल यातून त्याचा स्वतः विषयीचा महाभयंकर गर्व दिसून येईल.**

अफजल खान इतका क्रूर होता की त्याने कित्तेक लोकांना दगा फटका करून ठार केले होते. तो सत्ता धारण आणि राजकारणामध्ये प्रचंड क्रूर आणि स्वार्थी होता, पण स्वतः च्या जहागिरीतील लोकांनविषयी प्रचंड न्यायी, दयाळू आणि उदार हृदयाचा असल्याचा दाखवत होता. अफजल खानचा देवावर विश्वास नसला तरी शुभ-शकुन आणि भविष्य त्योतिष्य यांवर विश्वास होता

’शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम (उलिया जनावा ताज सुलताना) यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजलखानाने आपल्या शिरावर घेतलेली होती.

अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम खानाच्याकडे होता.

शाही फर्माने आणि प्रचंड मोठी फौज घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली तेव्हा खानाने या स्वारीविषयी कौल मागताच ***त्याच्या गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले***, परंतु अफजलखानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबतीत आ***णखी एक दुःखद बातमी घडली. ती म्हणजे त्याच्या सैन्यदलातील झेंडय़ाचा हत्ती (ढालगज) फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला***. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंकाकुशंका सुरू झाल्या. यावेळी खानाला 64 बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी लावला.

.

अफजल खानाला ऐकून ६४ बायका होत्या. लढाई मध्ये चुकन आपला मृत्यू झाला. तर आपल्या बायका दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करतील ही कल्पना सुद्धा त्याला सहन झाली नाही. त्याने प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला. त्या साठी त्याने विजापूर शहरापासून 7 किलोमीटर दूर असलेल्या एका निवांत जागेची निवड केली. त्या ठिकाणी त्याने ऐकून 64 कबरी खोदून घेतल्या त्या कबरीन पासून काही अनंतरावर पाण्याने भरलेली एक जुनाट विहीर होती. मोहिमेवर निघण्या अगोदरच त्याने आपल्या बायकांना पाण्यात बुडवून ठार केले आणि त्या कबरीनमध्ये दफन करुन टाकले. तिथे ऐकून 64 कबरी असल्या तरी विजापूर मधला हा भाग साठकबरीया ह्या नावाने प्रसिद्ध आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने 18 जानेवारी 2013 रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती.

विजापुरात गेलो तर तिथं आदिलशहाची कबर तर शिवरायांचा पुतळा आहे. विजापुरात गोल घुमट, मुलुखमैदान तोफ, अनेक नामांकित वास्तू पाहताना त अगदी नापीक जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एका भव्य दगडी चबुतऱ्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळय़ा पाषाणात या 64 कबरी आजही पाहण्यास मिळतात. दक्षिण उत्तर बाजूने चबुतऱ्याची लांबी जास्त असून त्यानुसार पहिल्या दोन रांगेत 7-7 समाधी आहेत, तर तिसऱया रांगेत 5 व 11 समाधींच्या 4 रांगा आहेत. सध्या काही समाधी उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
एकाच चबुतऱ्यावर 64 समाध्या पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. साधारणपणे यातील 42 समाध्यांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वतःसाठी कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते, परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर बांधली हा भाग वेगळा. स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल, परंतु एकाच ठिकाणी एका रांगेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशा समाधी पाहण्यास मिळत नाहीत. ज्याला रक्तरंजित इतिहास आहे.

पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला आहे, मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे साठ कबरींची दुरवस्था व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे खानाचे वंशज गुलबर्गा जिह्यातील अफजलपूरला राहतात. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मशीद व इतर वास्तू पाहण्यास मिळतात. पाहण्याचा चष्मा बदलला की प्रत्येकाची दृष्टी बदलते. त्यामुळे तिथे खानाला संताची उपमा दिली तर नवल वाटायला नको. एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी विजापुरात गेल्यानंतर साठ कबरींचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत आहे.
1]The last cries (The last cries)
2]On the outskirts of Bijapur, rest the 60 murdered wives of Adil Shah (On the outskirts of Bijapur, rest the 60 murdered wives of Adil 

No comments:

Post a Comment