बर्फाने कधी शेकतात? गरम पाण्याने कधी शेकतात?
एक सामान्य ठोकताळा आहे, की एखादी वस्तू, तापमान वाढल्यावर प्रसरण पावते आणि तापमान कमी झाले की आकुंचन पावते.
त्यामुळे जेव्हा आपण बर्फाने शेकावतो, तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. त्याउलट गरम पाण्याने शेकवल्यावर रक्तप्रवाह वाढतो.
आता या गोष्टीचा खुबीने वापर करून घ्यायचा. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्या पायांना सूज येते आणि पाय दुखतो तेव्हा काही कारणांमुळे आपल्या पायामध्ये रक्तप्रवाह वाढलेला असतो.
त्यासाठी आपण पाय हृदयापेक्षा जास्त उंचीवर ठेवतो आणि पाय बर्फाने शेकवतो.
हृदयापेक्षा जास्त उंचीवर पाय ठेवला की रक्तप्रवाह आधीच कमी होतो (गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध प्रवाह लागत असल्याने) आणि बर्फाने पाय शेकावला की रक्तवाहिन्या आकुंचन पावून सूज कमी येते.
No comments:
Post a Comment